शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Satara Rain: तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू, ३५ जण बेपत्ता; नद्यांना मोठा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 6:13 PM

Satara landslide, Rain update: पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळल्या, नद्यांना मोठा पूर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून यामुळे ८ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३५ जणांहून अधिक जण बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. (Satara flood, Rain update: 8 died and 35 missing.)

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासाता नवजा येते ७४६ तर कोयना येथे ६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कराड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. 

वाई तालुक्यातील देवरुख याठिकाणी ५ घरांवर दरड कोसळली आहे. त्याठिकाणाहून आत्तापर्यंत २७ जणांना वाचविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर याठिकाणीही मोठी दरड कोसळल्यामुळे त्याखाली १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. पाटण तालुक्यातीलच मिरगाव याठिकाणीही दरड कोसळल्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान झाले आहे. तर याठिकाणी १२ लोक बेपत्ता आहेत. याठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. मात्र, रस्ताच नसल्यामुळे ते देखील हतबल झाले आहेत. तरीही या लोकांना कोयना धरणातून बोटीच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरु आहे. ढोकावळे या पाटणमधीलच गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी जावली तालुक्यातील रेंगडी येथे वाहून गेलेल्या चार लोकांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले असून दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जोर येथील २ जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस