शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवेडे ६० गुरूजी येणार अडचणीत

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये छापासत्र; फोन जप्त करून दिली तंबी

सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकाऱ्यांकडून नवनविन उपाययोजना होत असतात. मात्र त्याला शिक्षकवर्गातून फाटे फोडले जातात. शासनानेच शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी केली होती. मात्र त्याचा वापर वाढल्याने तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी छापासत्र सुरू केले आहे. एका आठवड्यात शाळांमध्ये मोबाईल वापरणारे सुमारे ६० शिक्षक आढळून आल्याने संबंधित शिक्षकांवर काय कारवाई होणार? याची चर्चा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे.
शासनाने वर्गात मोबाईल वापरावर बंदी केली आहे. वर्गावर जाण्यापूर्वी मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून दिलेले असताना सध्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शाळांमध्ये शिक्षक मोबाईलचा सर्रास वापर करतात. अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आतापर्यंत तालुक्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक विभागांमधील जवळपास ४० शाळांना अचानक भेटी दिल्या. शाळाभेटीदरम्यान सुमारे ६० शिक्षक अध्यापणावेळी मोबाईलचा वापर करताना दिसून आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांचे मोबाईल जब्त करून त्यांना सक्त सूचना केल्या. त्यानंतर मोबाईल परत करण्यात आले. असे असले तरी, गटशिक्षणाधिकारी काय कारवाई करणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागूण राहिले आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे सातारा तालुक्यात काम करण्याऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तर जिल्ह्यातील इतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोणातून तसेच शासनाच्या मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांच्या भेटी कराव्यात, अशी मागणी शिक्षणप्रेमींमधून
तसेच पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)


अध्यापणाच्या वेळी प्राथमिक शिक्षकांनी मोबाईलचा वापर टाळावा. व आदर्श अध्यापणाद्वारे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे. यापुढे ही गुणवत्तेच्या दृष्टिने ही मोहीम अशीच चालू ठेवणार आहे.
- धनंजय चोपडे
गटशिक्षणाधिकारी, सातारा

शिक्षकांनी घेतली धास्ती
गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी महामार्गालगत असलेल्या एका शैक्षणिक बीटमधील दहा शाळांना गेल्या आठवड्यात भेटी दिल्या होत्या. या भेटी दरम्यान काही शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाईलवर बोलताना आढळले होते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी संबंधित शिक्षकांचे मोबाईल जप्त केले होते. तसेच लेटकमर्स शिक्षकांवरही बेशिस्तीबद्दल कारवाई करण्यात आली होती. या कार्रवाईची शिक्षकांनी धास्ती घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.