शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

साताऱ्यात एकाच दिवसात ५८ कोरोनारुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 02:28 IST

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसांत ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर २३७६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता दोन हजार ७०० इतकी झाल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. मृत्यूमध्ये सातारा आणि कऱ्हाड हे तालुके सर्वांत पुढे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण कमी यायला मार्ग नाही. बुधवारी सातारा तालुक्यात ४०९ इतके सर्वाधिक रुग्ण आढळले, तर त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये ३१० रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एक लाख १४ हजार २४२ रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. बुधवारी ५८ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाण कऱ्हाड आणि सातारा तालुक्यांत जास्त आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता असल्याने बाधितांसोबत त्यांच्या नातेवाइकांची पळापळ सुरूच आहे.

अहमदनगर : दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांकअहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा बुधवारी उच्चांक झाला. २४ तासांत तब्बल ४,४७५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गत आठवड्यात हीच रुग्णसंख्या चार हजार दोनशेपर्यंत गेली होती. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच विक्रमी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे.

सध्या जिल्ह्यात दररोज ३ हजार ते ३ हजार ५०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र १ मे रोजी प्रथमच कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ४ हजार २१९ इतकी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या निम्म्यावर घटली होती. मात्र बुधवारी रुग्णात वाढ झाली असून तो मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात बुधवारी ३,१०३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या वाढल्याने सध्या सक्रिय रुग्णांची संख्याही २५ हजार पार गेली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या आता १ लाख ९३ हजार ६४२ इतकी झाली आहे.

टॅग्स :satara-acसाताराSatara areaसातारा परिसर