शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशाने ४३ लाखांचा गंडा

By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST

दोघांवर गुन्हा : ‘बँक आॅफ बडोदा’कडून फिर्याद दाखल

कऱ्हाड : खोट्या धनादेशाद्वारे ‘बँक आॅफ बडोदा’ या बँकेला दोघांनी ४३ लाख ८२ हजार ६०० रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बँकेच्या कऱ्हाड शाखेचे व्यवस्थापक शंकर महादू ठोंगिरे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. देवशरण जैस्वाल (रा. बैगणवाडी, गोवंडी-मुंबई), पराग जयसुखलाल राठोड (रा. वापी-गुजरात) यांच्यावर याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक आॅफ बडोदाच्या मुंबईतील खांड बाजार शाखेत रविलाल विशानजी मारू यांचे बचत खाते आहे. रविलाल मारू यांच्या नावे बँकेने त्यांना चेकबुक अदा केले आहे. दरम्यान, २५ जून रोजी रविलाल मारू यांच्या खात्यावरील ९ लाख ३० हजारांचा देवशरण जैस्वाल या व्यक्तीच्या नावे असलेला धनादेश ‘एचडीएफसी’ बँकेतून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेत आला. तसेच संबंधित खात्यावरील १८ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा देवशरण जैस्वाल याच व्यक्तीच्या नावे दुसरा धनादेश २८ जून रोजी ‘एचडीएफसी’ बँकेकडून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेकडे आला. त्यानंतर ३ जुलै रोजी रविलाल मारू यांच्याच खात्यावरील १५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा पराग जयसुखलाल राठोड या व्यक्तीच्या नावे तिसरा धनादेश ‘एचडीएफसी’ बँकेकडून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेत आला. संबंधित तिन्ही धनादेशांची रक्कम बँक आॅफ बडोदाने अदा केली. दरम्यान, रविलाल मारू यांनी बँक आॅफ बडोदाच्या बडोदा येथील मुख्य कार्यालयात जाऊन त्यांच्या खात्यावर वठविण्यात आलेले तिन्ही धनादेश खोटे असल्याचे सांगत त्यांच्याकडील मूळ धनादेश बँकेला सादर केले. याबाबतची माहिती बडोदा येथील मुख्य कार्यालयातून कऱ्हाड शाखेला देण्यात आली. धनादेश खोटेकऱ्हाड शाखेने संबंधित मूळ धनादेश मागवून घेऊन क्लिअरिंगद्वारे रक्कम अदा केलेले धनादेश तपासले असता संबंधित धनादेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. बँकेची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर शाखा व्यवस्थापक शंकर ठोंगिरे यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसांत दिली आहे. (प्रतिनिधी)