साताऱ्यात 4 उमेदवारांना मतं सम-समान, शेखर गोरेंना मिळाला विजयाचा 'माण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:49 AM2021-11-23T11:49:09+5:302021-11-23T11:49:42+5:30

नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये, कोरेगाव आणि माण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहेत.

4 candidates get equal votes in Satara DCC bank, Shekhar Gore gets 'Maan' | साताऱ्यात 4 उमेदवारांना मतं सम-समान, शेखर गोरेंना मिळाला विजयाचा 'माण'

साताऱ्यात 4 उमेदवारांना मतं सम-समान, शेखर गोरेंना मिळाला विजयाचा 'माण'

googlenewsNext
ठळक मुद्देईश्वरी चिठ्ठीने आपल्या बाजूने कौल दिल्यामुळे ह्रदयाची वाढलेली धाकधूक शांत झाली अन् विजयाचा एकच जल्लोष झाला. यावेळी, वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

सातारा - जिल्हा बँकनिवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली असून आमदार शशिकांत शिंदे आणि मंत्री शंभूराजे देसाई या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. त्यात, माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना सम-समान मते मिळाल्याने या मतदारसंघात ईश्वर चिठ्ठीला माण मिळाला. त्यामध्ये, शेखर गोरेंना ईश्वरी कौल लाभला. त्यामुळे, विजयानंतर ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये, कोरेगाव आणि माण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा करण्यात आली कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मतं मिळाले, येथे एकूण 90 मतदान झाले होते. त्यामध्ये, सुनिल खत्री यांना ईश्वरी चिठ्ठीने कौल दिल्याने खत्री विजयी झाले आहेत. तर, माणमध्ये शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, येथेही विजयी उमेदवार ईश्वर चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आला. त्यामध्ये, शेखर गोरे नशिबवान ठरले आहेत.

ईश्वरी चिठ्ठीने आपल्या बाजूने कौल दिल्यामुळे ह्रदयाची वाढलेली धाकधूक शांत झाली अन् विजयाचा एकच जल्लोष झाला. यावेळी, वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. शेखर गोरे यांनी शेजारीच असलेल्या आपल्या समर्थकांना जादू की झप्पी देत डोळ्यांतून अश्रूंना वाट मोकळी केल्याचं दिसून आलं. त्यावेळी, अनिश्चिततेच्या निकालाचा हा आनंदी क्षण पाहून इतही समर्थक भावनिक झाले होते.   

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
सत्ताधारी सहकार पॅनल १८ जागा (१० बिनविरोध)
अपक्ष ३
 

Web Title: 4 candidates get equal votes in Satara DCC bank, Shekhar Gore gets 'Maan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.