शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऊसतोड टोळ्यांकडून ३९ कोटींची फसवणूक, राज्यातील ८१ कारखान्यांची फसवणूक झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:13 AM

कामगार व तत्सम यंत्रणा एकाच हंगामात एकापेक्षा अनेक कारखान्यांशी करार करून फसवणूक करतात

पिंपोडे बुद्रुक : सन २००४ पासून २०२० पर्यंत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड कामगार व तत्सम व्यवस्थेकडून सुमारे ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांइतकी फसवणूक झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  राज्यात एकाचवेळी सुमारे दोनशे कारखाने सुरू होतात. कारखाना हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाने कामगार, वाहतूकदार यांच्याशी करार करतात. परंतु कामगार व तत्सम यंत्रणा एकाच हंगामात एकापेक्षा अनेक कारखान्यांशी करार करून फसवणूक करतात. यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार या ॲपद्वारे सन २००४ ते २०२० पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऊस कामगार व तत्सम यंत्रणेकडून कारखान्यांची एकूण ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून या ॲपद्वारे गेली दोन वर्षे माहिती संकलित करण्यात आली आहे. ॲपमुळे एकूणच ऊस तोडणीच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

राज्यातील ऊस तोडणी कामगार यंत्रणा

ऊसतोडणी कामगार - १० लाखवाहनमालक - ५५ हजारमुकादम - ५० हजार२०२०-२०२१ करिताच्या नोंदीत माहिती पाहता ३८ हजार ९६७ वाहनधारक, २ हजार ४० मुकादम यांनी माहिती भरली आहे. तसेच ४ हजार १५३ लोकांनी ॲपचा वापर केला असून, ही संख्या चालूवर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी ऊसतोडणीसाठी साखर कारखाने मुकादम आणि ऊस तोडणी टोळी प्रमुखांना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल रक्कम देतात. प्रत्यक्षात रक्कम घेऊनही तोडणीस टोळ्यांचा पुरवठा न होण्यामुळे कारखाने पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल करीत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

ऊस तोडणी तसेच गाळप प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी साखर आयुक्तालय विशेष परिश्रम घेत आहे. त्यासाठी ॲपद्वारे ऊस नोंद, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार यांसारखे ॲप विकसित करून माहिती संकलन करून शेतकरी, ऊस तोड कामगार, वाहतूकदार, कारखानदार यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु अजूनही काही लोकांकडून वा यंत्रणांकडून जाणूनबुजून खरी माहिती लपवली जात आहे. त्यामुळे अशा प्रक्रारची फसवणूक प्रकरणे होत आहेत. सर्व यंत्रणांनी तसेच कारखान्यांनी खरी माहिती भरल्यास संभाव्य फसवणूक टाळता येणे शक्य आहे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने