शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:10 IST

साठेबाजांना दणका 

सातारा : सध्याच्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन सिलिंडरचा साठा करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दणका दिला असून कराडमध्ये १७ तर फलटणमध्ये १३ असे ३० सिलिंडर जप्त करून सुमारे १२ जणांवर कारवाई केली आहे.इराण युद्धामुळे लोकांमध्ये टंचाईची भीती वाढली आहे. याचा फायदा घेऊन साठेबाजांकडून कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. नुकतीच वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथे एका हॉटेलवर कारवाई करून तीन सिलिंडर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर दुसरी मोठी कारवाई कराड तालुक्यातील मुंढे येथे करण्यात आली आहे. या ठिकाणी एका घरात बेकायदा घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पुरवठा विभागाने धाड टाकून घरगुती आणि व्यावसायिक असे १३ गॅस सिलिंडर जप्त केले. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मलकापूर परिसरात चार सिलिंडर जप्त करण्यात आले. सर्व सिलिंडरची अंदाजे किंमत ३८ हजार ७७६ रुपये आहे.ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे आणि लिपिक सागर घोरपडे यांच्या पथकाने केली. पंच म्हणून शिवम पाटील आणि अशोक मखरे उपस्थित होते.

फलटणमध्ये १३ सिलिंडर जप्तजिल्हा पुरवठा विभागाने फलटण शहरात जिलेबी स्टॉल, चायनीज, हॉटेल्स, इंडस्ट्रियल एजन्सी येथून १३ सिलिंडर जप्त केले.

रहिवासी भागात असुरक्षितपणे सिलिंडरचा साठा करणे हे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा विभाग (PESO) तसेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रिब्युशन ऑर्डर २०००’ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. - वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: 30 Cylinders Seized in Karad, Phaltan; Action Against 12

Web Summary : Satara district administration seized 30 gas cylinders in Karad and Phaltan due to illegal hoarding amidst gas scarcity fears. Twelve individuals face action for violating safety regulations and creating artificial shortages. Raids were conducted following intelligence, uncovering unauthorized storage of domestic and commercial cylinders.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरSatara areaसातारा परिसरKaradकराड