Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:10 IST2026-03-18T16:09:29+5:302026-03-18T16:10:05+5:30

साठेबाजांना दणका 

30 cylinders seized from Karad, Phaltan Supply department takes action against 12 people | Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई

Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई

सातारा : सध्याच्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन सिलिंडरचा साठा करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दणका दिला असून कराडमध्ये १७ तर फलटणमध्ये १३ असे ३० सिलिंडर जप्त करून सुमारे १२ जणांवर कारवाई केली आहे.

इराण युद्धामुळे लोकांमध्ये टंचाईची भीती वाढली आहे. याचा फायदा घेऊन साठेबाजांकडून कृत्रिम टंचाई करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. नुकतीच वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथे एका हॉटेलवर कारवाई करून तीन सिलिंडर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर दुसरी मोठी कारवाई कराड तालुक्यातील मुंढे येथे करण्यात आली आहे. 

या ठिकाणी एका घरात बेकायदा घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पुरवठा विभागाने धाड टाकून घरगुती आणि व्यावसायिक असे १३ गॅस सिलिंडर जप्त केले. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मलकापूर परिसरात चार सिलिंडर जप्त करण्यात आले. सर्व सिलिंडरची अंदाजे किंमत ३८ हजार ७७६ रुपये आहे.

ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे आणि लिपिक सागर घोरपडे यांच्या पथकाने केली. पंच म्हणून शिवम पाटील आणि अशोक मखरे उपस्थित होते.

फलटणमध्ये १३ सिलिंडर जप्त

जिल्हा पुरवठा विभागाने फलटण शहरात जिलेबी स्टॉल, चायनीज, हॉटेल्स, इंडस्ट्रियल एजन्सी येथून १३ सिलिंडर जप्त केले.

रहिवासी भागात असुरक्षितपणे सिलिंडरचा साठा करणे हे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा विभाग (PESO) तसेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रिब्युशन ऑर्डर २०००’ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. - वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title : सतारा: कराड, फलटण में 30 सिलेंडर जब्त; 12 के खिलाफ कार्रवाई

Web Summary : सतारा जिला प्रशासन ने कराड और फलटण में गैस की कमी के डर के बीच अवैध रूप से जमाखोरी करने पर 30 गैस सिलेंडर जब्त किए। सुरक्षा नियमों का उल्लंघन करने और कृत्रिम कमी पैदा करने के लिए बारह लोगों के खिलाफ कार्रवाई की गई। खुफिया जानकारी के बाद छापे मारे गए, जिसमें घरेलू और व्यावसायिक सिलेंडरों का अनधिकृत भंडारण उजागर हुआ।

Web Title : Satara: 30 Cylinders Seized in Karad, Phaltan; Action Against 12

Web Summary : Satara district administration seized 30 gas cylinders in Karad and Phaltan due to illegal hoarding amidst gas scarcity fears. Twelve individuals face action for violating safety regulations and creating artificial shortages. Raids were conducted following intelligence, uncovering unauthorized storage of domestic and commercial cylinders.