कराडमधील कारवाईत २२२ पोती धान्यसाठा जप्त, पुरवठा विभागाचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:45 IST2026-03-30T12:45:13+5:302026-03-30T12:45:24+5:30

काळाबाजाराशी संबंधित बाबींचा तपास सुरू

222 bags of grain seized in Karad operation, supply department raids | कराडमधील कारवाईत २२२ पोती धान्यसाठा जप्त, पुरवठा विभागाचा छापा 

कराडमधील कारवाईत २२२ पोती धान्यसाठा जप्त, पुरवठा विभागाचा छापा 

कराड : कराड शहरातील वाखाण परिसरात असलेल्या एका खासगी धान्य गोडावूनवरती पुरवठा विभागाच्या वतीने रविवार, (दि. २९) रोजी दुपारी छापा टाकण्यात आला. यामध्ये तब्बल ११ टन गहू आणि तांदळाच्या २२२ पोत्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराडच्या पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांना वाखाण परिसरात एका खासगी गोडावूनमध्ये धान्यसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. गोडावून उघडल्यानंतर आतमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर गोदामचालक रमेश पाटणे यांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. प्रारंभी त्यांनी या साठ्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. दरम्यान, पंचनामा पूर्ण झाल्यानंतर यामध्ये दोषी आढळणाऱ्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत कराड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

काळाबाजाराशी संबंधित बाबींचा तपास सुरू

पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत तत्काळ पंचनामा प्रक्रिया सुरू केली. जप्त केलेले धान्य सुरक्षितपणे शासकीय गोदामात हलवण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या धान्यातील प्रत्येक पोते सुमारे ५० किलो वजनाचे असून, एकूण साठा ११ टनांहून अधिक आहे. प्राथमिक तपासात हे धान्य शासकीय वितरण प्रणालीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे हा साठा स्वस्त धान्य दुकानदारांसाठी असलेला सरकारी माल आहे का? याची सखोल चौकशी सुरू आहे.

Web Title : कराड में छापा: 222 बोरी अनाज जब्त, आपूर्ति विभाग की कार्रवाई।

Web Summary : कराड में आपूर्ति विभाग ने एक गोदाम पर छापा मारा, ₹3.5 लाख मूल्य के 222 बोरी (11 टन) गेहूं और चावल जब्त किए। कालाबाजारी से संबंध और अनाज के स्रोत की जांच जारी है।

Web Title : Raid in Karad: 222 sacks of grain seized, supply department action.

Web Summary : Supply department raided a godown in Karad, seizing 222 sacks (11 tons) of wheat and rice worth ₹3.5 lakhs. Investigation is underway regarding black market links and source of the grain.