शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Satara: बाजार समितीत तीस लाखांचा अपहार, पाटणच्या सभापतींसह २१ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:50 IST

लेखापरीक्षकांची फिर्याद 

कऱ्हाड : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बुधवारी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार बाजार समितीचे तत्कालीन सभापती, उपसभापती, संचालक, सचिव तसेच पेट्रोल पंप विभागप्रमुख अशा २१ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी सचिवाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे.सभापती रेखा दादासो पाटील (रा. निसरे), उपसभापती अभिजीत शंकरराव जाधव (रा. तारळे), संचालक अरविंद पांडुरंग जाधव (रा. लेंढोरी), अधिक मारुती माने (रा. मानेगाव), सुहास जगन्नाथ माने (रा. राहुडे), राजाराम मारुती मोरे (रा. जांभूळवाडी-कुंभारगाव), सुभाष बाबूराव पाटील (रा. मंद्रुळकोळे), शहाबाई सखाराम यादव, (रा. गारवडे), शंकर हैबती सपकाळ (रा. मालदान), श्रीरंग शामराव मोहिते (रा. बनपुरी), उत्तम सखाराम जाधव (रा. सणबूर), आनंदा परशराम डुबल (रा. आडुळ), सीताराम ज्ञानदेव मोरे (रा. डोंगळेवाडी), रामदास परशराम कदम (रा. नाडोली), शरद विश्वनाथ राऊत (रा. पाटण), आनंदराव सीताराम पवार (रा. मल्हारपेठ),जगन्नाथ विठ्ठल जाधव (रा. मेंढोशी), सचिव हरीष बंडू सूर्यवंशी (रा. पाटण), तारळे पेट्रोल पंप विभागप्रमुख राजेंद्र भगवान पवार (रा. मल्हारपेठ), मानेगाव पेट्रोल पंप विभागप्रमुख दिलीप महादेव उदुगडे (रा. नवसरी) व राजाराम रामचंद्र नाईक (रा. मानेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण बाजार समितीचे कामकाज मल्हारपेठ येथून चालविले जाते. बाजार समितीच्या एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा आदेश लेखापरीक्षक रमेश बागुल यांना मिळाला होता. त्यानुसार ११ जुलै २०२४ रोजी लेखापरीक्षक बागुल हे बाजार समितीच्या लेखापरीक्षणासाठी मल्हारपेठ येथे गेले. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ जुलै ते ३० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान बाजार समितीचे लेखापरीक्षण केले.

पेट्रोल पंपावरील रक्कमेचा गैरप्रकार..लेखापरीक्षणासाठी त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडून मुदतवाढ घेतली होती. लेखापरीक्षणाअंती १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत बाजार समितीच्या मानेगाव आणि तारळे येथील पेट्रोल पंपावर हातावरील रोख शिल्लक, व्हाउचर रक्कम, मागील स्टॉकमधील फरकाची रक्कम, आदी रकमेचा अपहार झाल्याचे दिसून आले. बाजार समितीचे तत्कालीन सभापती, उपसभापती, संचालक, सचिव, तसेच पेट्रोल पंप विभागप्रमुखांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी संगनमत करून ३० लाख ३२ हजार ५४१ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षक रमेश बागुल यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpatan-acपाटणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस