त्या १५ लाख रुपयातून मला कोर्ट कचेरीचा खर्च भागवायचाय: शालिनीतार्इंची मोदींवर बोचरी टीका... म्हणाल्या, शरद पवार रोज वेगळं बोलतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:17 IST2018-12-21T23:16:57+5:302018-12-21T23:17:36+5:30
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुकीआधी परदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख ...

त्या १५ लाख रुपयातून मला कोर्ट कचेरीचा खर्च भागवायचाय: शालिनीतार्इंची मोदींवर बोचरी टीका... म्हणाल्या, शरद पवार रोज वेगळं बोलतात
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुकीआधी परदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, अशी वल्गना केली होती. हे पैसे माझ्या खात्यावर कधी पडणार, याची मी वाट पाहत आहे. मला ते विचारण्याचा अधिकार आहे, या पैशांतून मला कोर्ट केसचा खर्च भागवता येईल, अशी बोचरी टीका माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘आर्थिकदृष्ट्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणून मला राष्ट्रवादीने पक्षातून बडतर्फ केले. आता राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षणाचे श्रेय घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण जाहीर केलं आहे. शरद पवार रोज वेगवेगळे बोलतात, त्यांच्यासारखं मला जमणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.