शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

साताऱ्याच्या संग्रहालयात कोल्हापुरातील १४० पुरातन शस्त्रे!

By सचिन काकडे | Published: April 28, 2024 8:20 PM

संग्रहालयात या वस्तूंचे योग्य ते संवर्धन केले जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कुपीत कोल्हापूर येथून १४० पुरातन शस्त्रे दाखल झाली आहेत. शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी नुकतीच ही शस्त्रे अभीरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली असून, संग्रहालयात या वस्तूंचे योग्य ते संवर्धन केले जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

मध्यवर्ती बससस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत शस्त्र, वस्त्र, तसेच अन्य दालनांच्या निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. या संग्रहालयात साताऱ्याची गादी (तख्त), मिनियर पेंटिंग, तलवारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखत, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघ नखे, बंदुकांचे प्रकार, संगिनी, अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, कातील बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला अशा दोन हजारांहून अधिक ऐतिहासिक व शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. या वस्तूंमध्ये आता नव्याने १४० पुरातन शस्त्रांची भर पडली आहे.कोल्हापूर येथील गिरीश जाधव यांनी पुरातन वस्तूंचा संग्रह केला होता. त्यांनी ही शस्त्रे कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभीरक्षक उदय सुर्वे यांच्याकडे संवर्धनासाठी सुपुर्द केली. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांनी काही शस्त्रे साताऱ्यातील संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नुकतीच ही शस्त्रे साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली. या शस्त्रांचे योग्य ते जतनीकरण, संवर्धन केले जाईल, अशी माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

या शस्त्रांचा समावेश४३ तलवारी, ५ ढाली, १० कट्यार, ३ दांडपट्टे, ८ जांबिया, ५ युद्धातील कुऱ्हाडी, १० भाले व अन्य शस्त्र. 

टॅग्स :satara-acसातारा