शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: साताऱ्यात १२७ तडीपारांना दोन तासांसाठी मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:11 IST

आज मध्यरात्रीपासूनच हद्दपारीचे आदेश

सातारा: सातारा पालिका निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी विविध गुन्हे नावावर दाखल असलेल्या १२७ आरोपींना सातारा शहर व सातारा तालुका परिसरातून तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी दि. २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात आली आहे.सातारा पालिकेची निवडणूक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हाेणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी सातारा नगर पालिका निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उप विभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५१ सराईत आरोपींकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना १ डिसेंबर २०२५ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत सातारा तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये प्रतापसिंह नगरातील युवराज जाधव, अक्षय आढाव यांचाही समावेश आहे.

दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७६ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या संशयितावर खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, संगनमत करून शिवीगाळ, दमदाटी करून गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर दाखल आहेत. या सर्वांना शाहूपुरी पोलिस ठाणे, सातारा शहर आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वावर करू नये, असे बजावण्यात आले आहे. परंतु मतदानासाठी त्यांनाही दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Exiled individuals get two hours to vote in local elections.

Web Summary : For Satara local elections, 127 previously exiled individuals with criminal records are temporarily allowed to vote on December 2nd, between 7:30 AM and 9:30 AM. This exception ensures their participation while maintaining election security, under police supervision in Satara city and taluka.