शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

जिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:18 PM

coronavirus, hospital, health, Satara area, Mahabaleshwar Hill Station सातारा जिल्ह्यातील कोरोना संकटाला आता नऊ महिने होत आले असून आतापर्यंत जवळपास ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १२ हजारांवर रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंदले आहेत. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर महाबळेश्वर आणि माण या तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...मृत संख्याही अधिक : महाबळेश्वर, माणमध्ये कोरोना रुग्ण संख्या सर्वात कमी

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला आता नऊ महिने होत आले असून आतापर्यंत जवळपास ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १२ हजारांवर रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंदले आहेत. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर महाबळेश्वर आणि माण या तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या आहे.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते.

एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले. पण, आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. कधी-कधी तर ५० पर्यंत रुग्ण आढळले. पण, यामुळे बाधितांचा आकडा वाढतच गेला.

सध्यस्थितीत जिल्ह्यात ४९७३२ रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील १२ हजार १४६ कोरोना रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत. तर यानंतर कºहाड तालुक्यात १० हजारांवर रुग्णांची नोंद झालेली आहे. इतर तालुक्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण बºयापैकी असल्याचे दिसून येत आहे.कोरोना बाधित आढळून येत आहेत तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो. लवकरच कोरोना बाधितांचा आकडा ५० हजार पार होणार आहे. तसेच मृतांचा आकडाही सध्या १७०० जवळ पोहोचला आहे.तालुकानिहाय कोरोना आकडेवारीतालुका    बाधित           मृत

  • सातारा -  १२१४६           ४३५
  • कऱ्हाड - १०५५३            ३३१
  • कोरेगाव - ४५०४          १४८
  • फलटण - ४३१७           १३१
  • वाई - ३७९५                १३२
  • खटाव - ३४८५             १४६
  • जावळी - २७९३            ६४
  • खंडाळा - २४४६           ६९
  • पाटण - २०२६          ११२
  • माण - १९४०             ८३
  • महाबळेश्वर - ११२९   २०
  • इतर जिल्हे - ५९८       ...
टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान