Satara: भंगार गोळा करताना सापडला दहा तोळ्यांचा राणीहार, महिलेने प्रामाणिकपणे केला परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:22 IST2024-09-13T12:20:39+5:302024-09-13T12:22:47+5:30

कऱ्हाड (जि. सातारा) : नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा ...

10 tola Ranihar found while collecting scraps, woman returns it in karad Satara | Satara: भंगार गोळा करताना सापडला दहा तोळ्यांचा राणीहार, महिलेने प्रामाणिकपणे केला परत 

Satara: भंगार गोळा करताना सापडला दहा तोळ्यांचा राणीहार, महिलेने प्रामाणिकपणे केला परत 

कऱ्हाड (जि. सातारा) : नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला. लाखो रुपयांचा हा ऐवज हातात आल्यानंतर कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती. मात्र, हातावर पोट असणाऱ्या त्या महिलेने प्रामाणिकपणा जपत सोनाराच्या माध्यमातून तो राणीहार पोलिसांकडे सुपूर्द केला. तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत केला.

गोटे (ता. कऱ्हाड) येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत ७ सप्टेंबर रोजी हरितालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर आले होते. कृष्णा नदीपात्रात हरितालिका मूर्ती विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून ८ लाख ३० हजार रुपये किमतीचा सुमारे दहा तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार नदीपात्रात विसर्जन झाला. दरम्यान, चार दिवसांनी ११ सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियमजवळ राहणाऱ्या नूरजहाँ फकीर या प्रीतिसंगम घाट परिसरात भंगार गोळा करण्यासाठी गेल्या.

भंगार गोळा करत असताना त्यांना राणीहार दिसला. त्यानंतर नूरजहाँ यांनी तो राणीहार त्यांच्या ओळखीचे सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला. निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली. त्यानंतर तिघेही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी तो हार जमा केला. त्यानंतर पोलिसांनी गोटे येथील अधिकराव पवार यांना बोलावून घेत ओळख पटवून राणीहार त्यांच्या ताब्यात दिला.

दहा हजारांचे बक्षीस; यथोचित गौरव

नूरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख रक्कम व यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच ही बाब पोलिसांना प्रामाणिकपणे कळविल्याबद्दल सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

Web Title: 10 tola Ranihar found while collecting scraps, woman returns it in karad Satara