शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Satara: मायणी येथे अडीच लाखांचा दहा किलो गांजा पकडला, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 11:56 IST

सातारा: मायणी, ता. खटाव येथील अभयारण्य परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त ...

सातारा: मायणी, ता. खटाव येथील अभयारण्य परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ५५ हजार रुपयांचा १० किलो २२४ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई दि. ६ रोजी दुपारी करण्यात आली. जाकीर गुलाब मुजावर (वय ४१, रा. सांगोला जिल्हा सोलापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले. या पथकाला जिल्ह्यातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक लागवड करणाऱ्या व्यक्तिंची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पथक माहिती काढत असताना एक व्यक्ती मायणी मधील अभयारण्य परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे पथकाला समजले. त्यानंतर एलसीबीचे पथक आणि वडूज पोलिसांनी तेथे जाऊन सापळा लावला. त्यावेळी जाकीर मुजावर हा गांजाची पिशवी घेऊन येताना पोलिसांना दिसला. त्याच्या पिशवीची पोलिसांनी झडती घेतली असता पिशवीमध्ये १० किलो २२४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अतीश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, गणेश कापरे, प्रवीण पवार आदींनी या कारवाईत भाग घेतला.गांजाला सोन्याचा भाव...अंमली पदार्थ विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अनेकजण झटपट पैसे मिळण्याच्या हव्यासाने गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असतात. स्थानिक गुन्हे शाखेने अशा प्रकारे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक मोहीम राबविली आहे. सहा महिन्यांत आतापर्यंत एक कोटीहून अधिक रकमेचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कोणी उसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती तर कोणी इमारतीच्या टेरेसवर. पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती काढून गांजाची लागवड उद्ध्वस्त केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस