धुळगावमध्ये मांडूळ साप बाळगणाऱ्या तरुणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:21 IST2021-05-20T16:18:43+5:302021-05-20T16:21:44+5:30
Crimenews Sangli ForestDepartment : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तनवीर रहमान कामिरकर (वय २४) आणि फिरोज सलीम मुजावर (२४, दोघेही रा. धुळगाव ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा साप जप्त केला आहे.

धुळगावमध्ये मांडूळ साप बाळगणाऱ्या तरुणांना अटक
सांगली : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तनवीर रहमान कामिरकर (वय २४) आणि फिरोज सलीम मुजावर (२४, दोघेही रा. धुळगाव ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा साप जप्त केला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक तासगाव विभागात गस्तीवर होते. यावेळी पथकातील कर्मचारी अजय बेद्रे यांना माहिती मिळाली की, धुळगाव येथील दोन तरुणांनी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगला आहे.
एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांना याची माहिती देत एलसीबी व वनविभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. धुळगाव येथील फिरोज मुजावर याच्या शेतातील शेडमध्ये एका बॅरेलमध्ये हा साप ठेवण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आलदर यांनी कारवाई केली.