शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident News: अपघातात तरूण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:50 IST

ट्रकचालक पसार

सांगली : सांगली ते आष्टा रस्त्यावर तुंग येथे राया हायटेक नर्सरी समोर रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार शिवकुमार श्रीकांत पाटील (वय २९, रा. ढवळी, ता. वाळवा) हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला यशवंत वसंत पाटील (रा. फार्णेवाडी) हा जखमी झाला. गुरूवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. सांगली ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढवळी येथील शिवकुमार पाटील व त्याचा मित्र यशवंत पाटील हो दोघेजण गुरूवारी रात्री दुचाकी (एमएच ०९ एजे ७४३६) वरून गावाकडे जात होते. तुंग येथील राया हायटेक नर्सरी समोर रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रक (आरजे ०९ जीडी ३९४३) आष्ट्याकडे तोंड करून थांबला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर ही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता.त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार याच्या डोक्याला, कपाळाला मार लागून गंभीर जखमी होऊन निपचिप पडला. तर मागे बसलेला यशवंत पाटील जखमी झाला. डॉक्टरांनी घटनास्थळी तपासल्यानंतर शिवकुमार हा मृत असल्याचे समजले. यशवंतला आष्टा येथे उपचारास नेले.सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. शिवकुमारचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताची माहिती मिळताच मृत शिवकुमारच्या नातेवाइकांनी धाव घेतली. त्याचे चुलते सुभाष संपतराव पाटील (वय ६४, रा. ढवळी) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाली.ट्रकचालक पसारतुंग येथे लावलेला राजस्थान पासिंगच्या ट्रकवर दुचाकी आदळून अपघात झाल्यानंतर चालकाने तेथून पलायन केल्याचे दिसून आले. अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Accident: Youth Killed, Mob Sets Truck Ablaze

Web Summary : A 29-year-old man died in Sangli after his motorcycle collided with a truck lacking reflectors. An angry mob torched the truck. Police are searching for the absconding driver. One person was injured.