Sangli: विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:19 IST2023-08-16T16:17:48+5:302023-08-16T16:19:17+5:30
विकास शहा शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथील सुनील भगवान कांबळे (वय २०) या युवकाचा घरातील नळपाणी कनेक्शनची विद्युत ...

Sangli: विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
विकास शहा
शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथील सुनील भगवान कांबळे (वय २०) या युवकाचा घरातील नळपाणी कनेक्शनची विद्युत मोटार सुरू करताना विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी (दि.१६) घडली.
याबाबत माहिती अशी की, सुनील हे घरातील ग्रामपंचायत नळ कनेक्शनला बसवलेली विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला. यानंतर तातडीने त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र त्यापूर्वी मृत्यू झाला होता.
याबाबत अजित कांबळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार सूर्यकांत कुंभार हे करीत आहेत. मयत सुनील यांच्या पश्यात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे.