शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार ठेकेदार रडारवर

By admin | Updated: November 13, 2014 23:50 IST

जिल्हा परिषद : जल व्यवस्थापन समिती सभेत ठराव

सांगली : जिल्ह्यात नळपाणी पुरवठा योजनेची ४८ कामे अद्याप अपूर्णावस्थेत असून, कामात कुचराई करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना कोणतीही नवीन कामे न देण्याचा ठराव आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला. त्याचप्रमाणे बहे ( ता. वाळवा) येथील १ कोटी ९८ लाखांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामास मंजुरी देण्यात आली.जल व्यवस्थापन समिती सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे आदींसह समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. छोटे पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात पाझर तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती केली जाते. सध्या त्यांच्याकडे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु हा निधी कमी पडत असल्याची बाब समितीसमोर आली. छोटे पाटबंधारे विभागाकडून ४६ कामे सुरु असून, नवीन १३ कामांना काही महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी ७ कोटी ८९ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून या कामांसाठी अजून २ कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळावा, असा ठराव करण्यात आला.छोटे पाटबंधारे विभागाचे नऊ अभियंता सध्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकडे कार्यरत आहेत. परंतु कामाचा वाढता आवाका लक्षात घेऊन, संबंधित नऊ अभियंत्यांना पुन्हा छोटे पाटबंधारे विभागाकडेच वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली. सभेत लेंगरे (ता. खानापूर) येथील ३६ लाख रुपयांच्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. यावेळी रोजगार हमी योजनेची माहिती गावा-गावात पोहोचवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)