शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 23:30 IST

सुमनताई पाटील : कवठेमहांकाळला आढावा बैठकीत इशारा

कवठेमहांकाळ : शासनाच्या विविध योजना राबवा. त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्या. गोरगरीब जनतेच्या कामात हयगय कराल तर याद राखा, कुणाचीही गय करणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत आमदार सुमनताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सुमनताई बोलत होत्या. या बैठकीत नागरिकांनी आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम करताना भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी आ. सुमनतार्इंनी प्रशासनाच्या कारभाराचा विभागवार आढावा घेतला. जरी पावसाला सुरुवात झाली असली तरी पाण्याचे स्रोत अजूनही बळकट झाले नाहीत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी टँकर चालूच ठेवावेत असे आदेश दिले. तिसंगी येथील आरोग्य सेविका हजर नसतात, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अग्रण धुळगाव येथील आरोग्य उपकेंद्र दीड वर्षापूर्वी उद्घाटनासाठी उघडले होते. तेंव्हापासून परत एकदा सुद्धा उपकेंद्राचे कुलूप काढले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. याशिवाय येथील आरोग्य सेविका मनमानी कारभार करीत असल्याने तात्काळ बदली करावी अशी मागणी झाली. याप्रकरणी आयुक्तांकडे अहवाल पाठविला असल्याचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनी सांगितले. ढालगावचे उपकेंद्रातील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. आ. सुमनताईनी यामध्ये लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सुभाष खांडेकर यांनी केली. या विषयावर आरोग्य आणि बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. आ. सुमनताई पाटील यांनीही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची कानउघाडणी केली. जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या. याशिवाय कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियान यासंदर्भातील कामांचा आढावा घेतला.स्वागत गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी केले. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी टँकरची माहिती दिली. विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी आभार मानले. यावेळी सभापती भाऊसाहेब पाटील, गजानन कोठावळे, दत्ताजीराव पाटील, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, मेघाताई झांबरे, उषाताई माने, कल्पना पाटील, जालिंदर देसाई, गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)