ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:02 IST2026-02-11T13:59:12+5:302026-02-11T14:02:25+5:30

'कसा पडला' यापेक्षा 'कसा लढला' याच न्यायाने त्यांनी लढत दिली, गावागावात माता-भगिनींकडून औक्षण

Workers of two defeated candidates took out a procession in Shirala in the Zilla Parishad elections in Sangli district | ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक

ZP Election 2026: नवलच! सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी विजयी नाही तर, पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक

कोकरूड : निवडणूक कोणतीही असो, जय पराजय हा ठरलेलाच असतो. विजयी उमेदवार फटाके फोडत, गुलाल उधळत मिरवणूक काढतो. मात्र, शिराळा तालुक्यातील दोन पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीही मिरवणूक काढली. गावागावातील लोक सहभागी झाले. महिलांनी त्यांना चक्क ओवाळले. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला.

आमदार सत्यजीत देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकरूड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध जन सुराज्य-भाजप अशी लढत होती. गटात जन सुराज्यचे साईतेजस्वी देशमुख तर पंचायत समिती गणात भाजपचे बाजीराव पाटील विजयी झाले. राष्ट्रवादीचे विनोद पन्हाळकर कोकरूड गटात आणि प्रमोद ऊर्फ आबा पाटील गणामध्ये पराभूत झाले.

या दोन तरुण युवकांनी आमदार देशमुख यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार लढत दिल्यामुळे त्यांचे नाव तालुका भर झाले. पराभव होऊनही त्यांच्या मनात नाराजी नव्हती. 'कसा पडला' यापेक्षा 'कसा लढला' याच न्यायाने त्यांनी लढत दिली होती. विनोद पन्हाळकर आणि प्रमोद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याचे ठरवले. दोघांनीही पाठिंबा दिला.

गावागावात माता-भगिनींकडून औक्षण

कोकरूड गटातील सर्व गावांत मिरवणूक निघाली. गावागावात माता-भगिनींकडून औक्षण करून जल्लोषात स्वागत केले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंग नाईक, रणधीर नाईक यांनी पाठीवर थाप टाकून कौतुक केले. पराभूत उमेदवारांनी मिरवणूक काढल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तालुक्यात याची चर्चा आहे.

Web Title : अनोखा! सांगली ZP चुनाव में पराजित उम्मीदवारों का जुलूस

Web Summary : शिराला में, पराजित ZP और पंचायत समिति उम्मीदवारों को गाँव-भर का समर्थन मिला। स्थापित नेताओं से हारने के बावजूद, उनकी उत्साही लड़ाई को जुलूसों और पारंपरिक स्वागतों के साथ मनाया गया, जो उनके प्रभाव को उजागर करता है।

Web Title : Unique! Defeated Candidates' Procession in Sangli ZP Election Draws Crowds

Web Summary : In Shirala, defeated ZP and Panchayat Samiti candidates received village-wide support. Despite losing to established leaders, their spirited fight was celebrated with processions and traditional welcomes, highlighting their impact.