शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याच्या हिसड्याने महिला जखमी

By admin | Updated: December 25, 2016 23:48 IST

सांगलीतील घटना : गळ्याला जखम; गंठण न तुटल्याने चोरटे पसार

सांगली : चालत निघालेल्या महिलेचे सोन्याचे गंठण ‘धूम’ टोळीने लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण गंठण न तुटल्याने चोरटे तसेच पसार झाले. गंठण ओढताना जोराचा हिसडा दिल्याने गळ्याला जखम होऊन ही महिला जखमी झाली आहे. आंबेडकर रस्त्यावर रविवारी सकाळी ही घटना घडली. मात्र या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.‘सिव्हिल’ चौक परिसरातील महिला सकाळी नऊ वाजता मुख्य बस स्थानकाकडे निघाली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरुन २५ ते ३० वयोगटातील तिघे आले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील गंठणला हात घालून हिसडा मारला. पण एका हिसक्याने ते तुटले नाही. त्यामुळे चोरट्याने आणखी एक हिसडा मारला. तरीही त्यांना ते मिळाले नाही. पण महिलेच्या गळ्याला जोराची ओढ बसल्याने जखमही झाली. तिने आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी बस स्थानकाच्या दिशेने पलायन केले. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळही कमी होती. परिसरातील लोक जमा झाले. या महिलेस पाणी देण्यात आले. तिला रुग्णालयात नेण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. पण महत्त्वाचे काम असल्याचे सांगून ती तेथून निघून गेली. या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी तक्रार देण्यास संबंधित महिला आली नाही, त्यामुळे कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)