शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कार्यकर्त्यांत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:03 IST

पुण्यातील बैठकीकडे लक्ष

सांगली : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली तेव्हा पक्षांतर्गत मतभेदामुळे अनेकांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण, आता एकत्रीकरणामुळे पुन्हा गळ्यात गळे घालावे लागण्याच्या शक्यतेने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांत चलबिचल आहे.महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यात पुण्यासह विविध ठिकाणी युतीतून बाहेर पडत लढतीचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (शरद पवार) हातमिळवणी केली आहे. हातमिळवणीचा हा पुणे पॅटर्न सांगलीतही राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगलीत महापालिका निवडणुकीबाबत भाजप आक्रमक स्थितीत आहे. याल तर सोबत, अन्यथा ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका अनेकदा दिसून आली आहे. या स्थितीत महायुती होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही आपापल्या मार्गांनी निघाल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाने गेल्या आठवडाभरापासून स्वतंत्ररीत्या इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका लावला आहे. सांगली आणि मिरजेत स्वतंत्र मुलाखती घेत आपण स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहोत. असा संदेश दिला आहे. दुसरीकडे शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीत कायम असल्याचे चित्र आहे.

गुरुवारी सांगलीत महाविकास आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती घेतली. आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवार गटाचाही समावेश होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेसाठी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसे व्हायचे असल्यास शरद पवार गटाला महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. सध्या तरी तसे चित्र नाही.

पुण्यातील बैठकीकडे लक्षसांगलीत दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याविषयी पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. पण, सांगलीत मात्र दोन्ही गटांनी जणू सवतासुभा मांडला आहे. इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेऊन महापालिकेचे रणांगण स्वतंत्र लढणार असल्याचा संदेश दिला आहे.

जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढणार नाहीत. किंबहुना आमचा शरद पवार गट जिल्हा परिषदेसाठी काँग्रेससोबत आघाडीसाठी बोलणी करत आहे. महापालिका क्षेत्रात हातमिळवणीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. - देवराज पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: Two NCP factions to unite? Unease among workers.

Web Summary : Sangli's political landscape is uncertain as both NCP factions consider uniting for municipal elections, causing unrest among local leaders and workers. While Pawar group allies with Maha Vikas Aghadi, the decision rests with senior leaders.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार