शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोण सांभाळणार पालिकेचा बझार?

By admin | Updated: October 18, 2015 23:40 IST

वचकच संपला : काँग्रेस नेतृत्वावर भवितव्य अवलंबून

शीतल पाटील --सांगली--महापालिकेतील नानाविध तऱ्हेच्या नगरसेवकांत मदन पाटील यांचा जबरदस्त वचक होता. केवळ डोळे मोठे केले तरी वादळे शांत व्हायची. त्यांच्या हयातीतच महापालिकेतील काँग्रेसला फाटाफुटीचे ग्रहण लागले होते. आता मदनभाऊंच्या पश्चात महापालिकेच्या बिग बझारचे काय होणार, याची चर्चा आता शहरात होऊ लागली आहे. मदनभाऊ गटाचे नेतृत्व कोण करणार, यावरच महापालिकेची समीकरणे अवलंबून आहेत. मदनभाऊंचा पक्ष कोणता, यापेक्षा त्यांच्या गटाचीच चर्चा अधिक होत असे. मदन पाटील हाच आमचा पक्ष, असे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही. केवळ मदनभाऊंनी शब्द टाकला की हजारो तरुण कामाला लागत. तीच स्थिती महापालिकेतील नगरसेवकांची होती. एखादे पद मागताना, ते न मिळाल्यास थयथयाट करणारे नगरसेवक, मदनभाऊंचा निरोप आला की शांत होत. त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याची हिंमत कोणाची होत नसे. पण आता त्यांच्या पश्चात हा वचकही संपला आहे. नगरसेवकांच्या नाना तऱ्हा सांभाळताना, त्यांच्या इच्छा- आकांक्षांची पूर्तता करताना भल्या-भल्यांच्या नाकी नऊ येत असे. त्याचा अनुभव राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला आहे. विकास महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेची सत्ता मदनभाऊंच्या हातून हिसकावून घेतली. तेव्हा मदनभाऊंनी महाआघाडीचा ‘बिग बझार’ संपेल, असे भाकित केले होते आणि ते खरेही ठरले. पण अवघ्या तीन वर्षात त्यांच्या सत्तेला सुरूंग लागला. नगरसेवकांची फाटाफूट झाली. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेची ही सर्कस तब्बल ३५ वर्षे सांभाळण्यात केवळ मदनभाऊच यशस्वी ठरले होते. दोन वर्षापूर्वी पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्तांतर झाले. पण गेल्या वर्षभरात पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये फाटाफूट सुरू झाली होती. पतंगराव कदम या नावाने नवा गट तयार होत आहे. काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक या गटात आहेत. त्यात मदनभाऊंनी ज्यांना पालिकेच्या राजकारणात आणले, ते कधीकाळचे निष्ठावंत म्हणविणारे नगरसेवकही आहेत. त्यांच्या हयातीतच फुटीचे ग्रहण लागले असताना, आता त्यांच्या पश्चात काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. लाखो रुपये खर्च करून नगरसेवक झालेल्यांना आता पुढील निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यासाठी त्यांचे पालिकेतील मलिद्यावरच लक्ष आहे. अशा काही नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत पतंगराव कदम, जयंत पाटील, संभाजी पवार यांच्यासह भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणारे नगरसेवकही आहेत. त्यात मदनभाऊंचा गट मोठा आहे. आता या गटाला आधार देण्याचे काम कोण करणार, हा खरा प्रश्न आहे. पतंगराव कदम हे काँग्रेसचे नेते असले तरी, त्यांनी महापालिकेच्या राजकारणात फारसे लक्ष घातलेले नाही. जयंतरावांनी पालिकेत पाच वर्षे कारभार केला आहे. त्यात गेल्या वर्षभरात मदनभाऊ व जयंतरावांचे सूर जुळले होते. त्यादृष्टीनेही तर्कवितर्क काढले जात आहेत. नजीकच्या काळात मदनभाऊ गटाचे नेतृत्व कोण करणार, यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. जयश्रीतार्इंसाठी आग्रहमदनभाऊ निष्ठावंतांचा ओढा मात्र त्यांच्या घराण्यातील व्यक्तीकडे आहे. सध्या तरी या निष्ठावंतांना त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंचाच आधार दिसून येतो. प्रत्येकाच्या तोंडी जयश्रीतार्इंचे नाव आहे. त्यांनी मदनभाऊ गटाची जबाबदारी सांभाळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पण त्या काय निर्णय घेतात, यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत.