शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली विधानसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये आता दावेदारी कोणाची?, चर्चेतील नावे.. जाणून घ्या

By अविनाश कोळी | Updated: September 5, 2024 18:17 IST

गाडगीळांच्या निर्णयावरून संभ्रम कायम, कार्यकर्त्यांत अस्वस्थता 

अविनाश कोळीसांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. गाडगीळ यांच्याऐवजी सांगली मतदारसंघातून कोण दावेदारी करणार व कोणाला येथील उमेदवारी मिळणार, हा विषयही चर्चेत आला आहे. पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, शिवाजी डोंगरे यांच्यासह अर्धा डझन इच्छुकांची नावे आता चर्चेत आली आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. आता सांगली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून विद्यमान आमदार गाडगीळ यांनी माघार घेतल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ सांगली व मिरज या दोनच मतदारसंघांत मागील निवडणुकीत भाजपला विजय मिळाला होता. दोन विद्यमान आमदारांपैकी आता गाडगीळ यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.गाडगीळ यांना पर्याय म्हणून यापूर्वीही काही नावे चर्चेत आली होती. ती नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, दिवंगत भाजप नेते संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोेंगरे ही नावे चर्चेत आहेत. यातील बहुतांश जणांनी इच्छुक म्हणून तयारीसुद्धा केली आहे. गाडगीळ त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर त्यांना सक्षम पर्याय म्हणून उमेदवार निवडताना भाजप नेत्यांचा कस लागणार आहे.

गाडगीळांच्या निर्णयावरून संभ्रम कायमसुधीर गाडगीळ यांनी अचानक निवडणुकीपासून फारकत घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यांनी असा निर्णय का घेतला, याबाबत संभ्रम कायम आहे. सर्वमान्य उमेदवार देण्यावरून पक्षांतर्गत गोंधळ होण्याची चिन्हेही आहेत.

कार्यकर्ते विभागले जाण्याची भीतीगाडगीळ यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांशीही त्यांचा समन्वय चांगला आहे. त्यामुळे दोन निवडणुकांमध्ये त्यांना या सर्व नेत्यांची मोट बांधणे सहज शक्य झाले होते. आता गाडगीळ यांनी माघार घेतल्यानंतर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे. ज्या इच्छुकाचे तिकीट डावलले जाईल त्यांचे समर्थक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करतील का, याबाबत साशंकता आहे.

सुधीर गाडगीळ यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पक्षाने अद्याप विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविलेले नाहीत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. - प्रकाश ढंग, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाSudhir Gadgilसुधीर गाडगीळ