शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावांचा दुष्काळ संपविला; पण डोर्लीच्या शेतकऱ्यांना सुकाळ नाही गवसला, सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:51 IST

पुनर्वसित गावाची कहाणी : ३५ वर्षांचा संघर्ष संपणार तरी कधी?

दत्ता पाटीलतासगाव : दुष्काळातल्या तब्बल नऊ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार म्हणून एका गावाने विस्थापित होण्याचं बलिदान दिले. तलावाच्या उभारणीने एकीकडे समृद्धीचे पाट वाहत असताना विस्थापित झालेल्या डोर्लीकरांना छप्परासाठी वाट पाहत बसावी लागली. प्रकल्पग्रस्त म्हणून ना नोकरी मिळाली, ना पक्की घरे, ना भौतिक सुविधा, ना सुसह्य जीवन. तीन तपांचा हा संघर्ष, वनवास संपणार तरी कधी, असा सवाल डोर्लीकरांमधून उपस्थित होत आहे.तब्बल ३५ वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यातील चार गावांतील जमिनींचे लोढे तलावासाठी अधिग्रहण झाले. लोढे मध्यम प्रकल्प तलावासाठी १९८९मध्ये लोढे डोर्ली, कौलगे, आरवडे परिसरातील जमिनीचे अधिग्रहण झाले. या अधिग्रहणात डोर्ली गावातील तब्बल अडीचशे एकर जमीन अधिग्रहित झाली. इतकेच नव्हे तर डोर्ली गावठाणदेखील या तलावात गेले. या तलावामुळे डोर्ली गाव पूर्णपणे विस्थापित झाले.

विस्थापितांना त्यावेळी शासनाने जमिनीसाठी एकरी आठ हजार रुपये, तर घरांसाठी प्रति २५ चौरस फुटाला पंधराशे रुपये अशी तुटपुंजी मदत दिली. डोर्लीपासून काही किलोमीटर अंतरावर शासकीय जागेवर प्लॉट पाडून प्रत्येकी तीन गुंठ्यांचा प्लॉट दिला गेला. या प्लॉटसाठीची रक्कमही मिळालेल्या मदतीतून कपातच करून दिली.

शासनाने दिलेल्या तुटपुंज्या मदतीवर नवी डोर्लीमध्ये विस्थापितांनी झोपडीवजा घरे उभी केली. ती आता पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. ओढ्याकाठच्या कसदार जमिनी जाऊन झालेल्या तलावात पंचक्रोशीचे नंदनवन झाले. मात्र, जमिनी आणि घरे गेलेल्या डोर्लीकरांच्या नशिबी वनवास आला.

शासनाने दिलेले प्लॉट वर्ग दोनमध्ये समाविष्ट आहेत. प्रकल्पग्रस्त दाखले काढूनही कुचकामी ठरले आहेत. ३५ वर्षांत ना अंतर्गत रस्ते झाले, ना भौतिक सुविधा झाल्या. १०१ कुटुंबांना आज राहण्यासाठी घर नाही. त्यात अपवाद सोडला तर बहुतांश कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हे शेतमजुरीच आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण पूर्ण करायचं की घराचं स्वप्न साकार करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे.

डोर्ली गाव विस्थापित झाल्यानंतर ४१ कुटुंबांनी प्रकल्पग्रस्त दाखले मिळवले. त्यापैकी अवघ्या सात जणांनाच आजअखेर नोकरी लागली. अनेकांचे वय संपून गेले आहे. शासनाने घरकुलाचा लाभ तातडीने देऊन, प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी किंवा त्या बदल्यात आर्थिक मोबदला तरी द्यावा. -हणमंत पाटील, पोलिस पाटील, डोर्ली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळHomeसुंदर गृहनियोजन