शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:18 IST

रोहित पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू

महेश देसाईकवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव येथे बेकायदेशीर टोलनाक्याचा भुर्दंड कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. वारंवार विविध संघटनेच्या वतीने हा टोलनाका बंद करण्याच्या विरोधात आंदोलन झाले तरीही हा टोल अद्याप बंद केला नाही. उलट जोमाने सुरू आहेत. हा सुरू असलेला बेकायदेशीर टोल नाका बंद होणार तरी कधी? आमदार रोहित पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात टोल बंद करण्याची मागणी केली. या मागणीला यश मिळणार का? असा प्रश्न कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना पडला आहे.त्याचबरोबर तालुक्यात अपुरे रस्त्याचे कामे व अपुऱ्या उपाय योजना व सुविधा असताना तालुक्यातील बोरगाव येथे टोल वसुली मात्र जोमाने होत आहे. एकीकडे वाहनधारकांची गैरसोय होताना दिसते तर दुसरीकडे शासनाने वाहनधारकांना लुटण्यासाठी बेकायदेशीर टोलनाका ठेवला आहे. अपुऱ्या सुविधा व अपुरे रस्ते असताना टोल का घेतात? असा संताप ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून होतो तर कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना बिनकामाचे भुर्दंड का सोसावा, असाही संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

महामार्गावरचे असलेले अपुरे कामेखरशिंग फाटा येथील उड्डाण पूल व सर्व्हिस रोड, अलकुड एम येथील सर्व्हिस रोडवरील गतिरोधक, शिरढोण येथील अग्रणी नदीवरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड तसेच नवीन पूल, तसेच शिरढोण येथील सर्व्हिस रोडलगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते गटार करणे, कुची येथील अपूर्ण गटार सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते डांबरीकरण करणे, नरसिंहगाव येथील सर्व्हिस रोडचे अपूर्ण कामे, सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे रस्ते डांबरीकरण करणे, हायवे लगतच्या व आतील गावांच्या नावांचे फलक, शिरढोणकडून तासगावकडे जाताना महामार्गाच्या हद्दीत खड्डे आहेत. यासह अन्य किरकोळ कामे ही सर्व अपूर्ण कामे आहेत.

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यापासून कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाका हा साधारण ५२ किमी अंतरावर आहे. येथे टोल नाका झाल्यामुळे याचा माझ्या मतदारसंघातील प्रवाशांना सांगली, मिरजेला जाण्यासाठी टोलचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शासनाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा टोलनाका बंद करावा, अशी मागणी नागपूर येथील अधिवेशनात केली. परंतु हा टोलनाका बंद करण्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. - आमदार रोहित पाटील

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाRohit Patilरोहित पाटिल