शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

स्पेन-इंग्लंडचे व-हाड रंगले कोकरूडच्या लग्नात-: भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 9:28 PM

वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झाली होती.

ठळक मुद्देसोहळा उत्साहात

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथील शामराव गमे यांचे पुत्र धनराज यांचा विवाह स्पेनमधील लुईस चवारी यांची कन्या नागोरी हिच्याशी रविवार, दि. १० रोजी अस्वलवाडी येथे भारतीय संस्कृतीप्रमाणे उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात स्पेन व इंग्लंडमधील व-हाडी मंडळीही सहभागी झाल्याने कार्यक्रमात अनोखा साज चढला होता.

धनराज गमे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोकरुड येथे झाले, तर अभियांत्रिकी शिक्षण कोल्हापूर येथे झाले. शिक्षण झाल्यानंतर त्यांना कंपनीतर्फे इंग्लंड येथे चार वर्षांपूर्वी पाठवण्यात आले. दोन वर्षापूर्वी तेथे स्पेनहून आलेल्या नागोरी हिच्याशी त्यांची ओळख झाली. यातून धनराज आणि नागोरी एकमेकांच्या प्रेमात पडले. एक वर्षापूर्वी धनराज यांनी आपले गाव, घर, नातेवाईक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती देण्यासाठी नागोरी, तिची आई जुलिया, वडील लुईस यांना गावी आणले होते. त्यावेळी धनराज यांनी नागोरी व तिच्या सर्व नातेवाईकांची कुटुंबाशी ओळख करून दिली होती.

दोघांच्या कुटुंबांनी या लग्नाला संमती दिली होती; मात्र लग्न आपल्याकडेच आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे व्हावे एवढीच अट धनराजच्या कुटुंबियांची होती. त्याप्रमाणे धनराज आणि नागोरी यांचा विवाह रविवारी भारतीय संस्कृतीप्रमाणे मुहूर्तावर पार पडला.

परदेशातील सर्व मंडळी ६ नोव्हेंबर रोजी कोकरूडला दाखल झाली. या सर्व मंडळींना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला. धनराज यांच्या बाजूने गावातील मित्रमंडळी, नातेवाईक, तर वधू पक्षाकडून राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया आदी मंडळींनी सर्व विधी पार पाडला. स्पेन आणि इंग्लंडवरुन आलेल्या वधू पक्षाकडील महिला नऊवारी साडी नेसून, तर पुरुष मंडळी भारतीय वेशभूषेत विवाह समारंभात सहभागी झाली होती.येथील संस्कृती चांगलीनागोरी हिची आई जुलिया आणि वडील लुईस म्हणाले की,आमची मुलगी नागोरी हिने घेतलेला निर्णय योग्य असून, धनराज अत्यंत गुणी मुलगा आहे. येथील संस्कृती चांगली असून, धनराजसह सर्वजण तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतील.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नIndiaभारत