शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:30 IST

जयंत पाटील राजकारणातील खलनायकच, जिल्ह्यात विकासात खोडा

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील हे नायक होते, मात्र जयंत पाटीलराजकारणातील खलनायकच आहेत. जिल्ह्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, असा इशारा भाजप नेते व सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिला.पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रमाच्या नावाखाली अनेकांचा विश्वासघात केला. सांगलीच्या स्वाभिमानी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या विश्वासघाती राजकारणात अनेकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र संस्कृती दाखविण्यासाठी राज्यातील नेते सांगलीत आणून सभा घेतली. ही राजकारणात प्रस्थापितांची झुंडशाही आहे. दिवंगत आर. आर. आबांच्या पत्नी व मुलावर दगडफेक करणाऱ्या हातांना कोणाचे बळ होते? वसंतदादांचे वारस राजकीय पटलावरून नेस्तनाबूत झाले पाहिजेत, यासाठी कोणी कारस्थाने केली हे लोकांसमोर आणणार आहोत. ज्या लोकांनी राजारामबापू व जयंत पाटील यांना उभे केले, त्यांच्या अस्तित्वावर सत्तेची कुऱ्हाड घातली. कवठेमहांकाळचा महांकांली कारखाना, जतचा डफळे कारखान्याच्या व्यवहाराचा हिशेब मांडणार आहोत. राजारामबापूंना वसंतदादाप्रेमी जनता जिल्ह्यात फिरू देत नव्हती. तेव्हा दिवंगत आमदार संभाजी पवार ढाल बनून त्यांच्या मागे उभे राहिले. जयंत पाटील यांनाही सांगलीत आणले. पण, त्यांनीच कुटील कारस्थाने केले.शेतकरी संघटनेचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. बहुजन नेतृत्वाची सतत नाकाबंदी केली. सांगलीच्या विकासात खोडा घातला. कवलापूर विमानतळाच्या १६५ एक जागेचा बाजार असो, सांगली बंधारा पाडण्याचा घाट असो, अनेक कटकारस्थाने रचण्यात आली. जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन लढाई हाती घेणार असल्याचे पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil's true face will be exposed: Prithviraj Pawar warns.

Web Summary : Prithviraj Pawar accuses Jayant Patil of betraying Sangli's people and hindering development. He vowed to expose Patil's alleged misdeeds, including land scams and political conspiracies, and fight for those affected by his actions. Pawar claims Patil obstructed the rise of other leaders.