शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:35 IST

जनभावनेचा आदर करण्याची अजितराव घोरपडे यांची भूमिका, गटस्थापनेसाठी दोन दिवसांत बैठक

सांगली : जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावरून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात जुगलबंदी रंगताना दिसत आहे. भाजप महायुतीला पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही, अशी भीती भाजपमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचे अस्त्र दाखविले आहे, तर `आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही`, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे.सत्तेचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार, याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या भूमिकेनंतर निश्चित होणार आहे. भाजपला पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घालणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता पाठिंब्याविषयी दुमत असल्याचे संकेत मिळत आहेत. मिरजेत बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही किंबहुना परस्परविरोधी भूमिका व्यक्त केल्या. आता पक्षाच्या नेत्यांनीही स्पष्टपणेे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. `पालकमंत्र्यांचे आम्ही ऐकलेच पाहिजे असे नाही`, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी `लोकमत`शी बोलताना व्यक्त केली. पक्षाचे सहा सदस्य निवडून आले असून, सत्तेच्या निर्णयात त्यांची भूमिका निर्णायक आहे. घोरपडे यांनी सांगितले की, `आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास आघाडीचे संख्याबळ भाजपपेक्षा कितीतरी जास्त होईल. त्यामुळे पाठिंब्याच्या निर्णयाबाबत आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला लोकभावनेचा आदर केलाच पाहिजे. व्हीपचा निर्णय आमच्याच पक्षपातळीवर होईल. पालकमंत्री सांगतात तसे होईल, असे नाही. आम्हाला मोठ्या प्रमाणात लोक येऊन भेटत आहेत. मूळ राजकीय भूमिका सोडू नका, अशी सूचना करत आहेत. कोणीतरी गळ घालेल. पण, त्याला बळी पडू नका, असेही सांगत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आम्हाला विचार केलाच पाहिजे`.

पालकमंत्र्यांना व्हीपची भाषा का करावी लागली?राष्ट्रवादी (अजित पवार)मधील मतभिन्नता पुढे आल्यानेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना व्हीपची भाषा करावी लागल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पक्षाचे नेते माजी खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक यांच्यात एकमत झाले, तरच पाठिंब्याचा निर्णय होऊ शकतो. पण, तूर्त तसे चित्र नसल्याने व्हीपचा पत्ता चंद्रकांत पाटील यांना बाहेर काढावा लागल्याची चर्चा आहे.

समविचारी पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढवली. आता निवडणुकीनंतर पाठिंब्याचा निर्णय घेतानाही हीच भूमिका कायम ठेवा, असे निर्देश मुंबईतील वरिष्ठांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे आम्ही भाजप महायुतीला पाठिंबा देणार नाही, असा अर्थ त्यातून निघू शकतो. पालकमंत्र्यांचे आम्ही ऐकलेच पाहिजे, असे नाही. त्यांच्यामागे गेले पाहिजे, असेही नाही. गट स्थापना व गटनेता निवडीसाठी दोन दिवसात आमची बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील चर्चा होईल. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री, राष्ट्रवादी (अजित पवार)

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP: NCP defiance sparks BJP tensions over power share.

Web Summary : Sangli ZP witnesses a power struggle between BJP and NCP. NCP leaders question the need to heed BJP's directives regarding support, hinting at potential alliance shifts. The decision hinges on Shinde Sena's stance.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा