शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वारणा धरणातील पाणीसाठ्यात १० टीएमसी घट, पाझर तलाव पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:35 IST

टंचाईग्रस्त १७ वाड्या व १३ गावांसाठी आराखडा तयार केला

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा १.७७ टीएमसीने जादा आहे. टंचाईग्रस्त १७ वाड्या व १३ गावांसाठी आराखडा तयार केला आहे.चांदोली धरणातून फक्त वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात १,४७०, तर कालव्यात ३०० असा एकूण १,७७० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नदीकाठचे शेतकरी, पाणीपुरवठा योजना, वाकुर्डे बुद्रुक व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले आहे. या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून २४.०९ टीएमसी (६९.९२ %) तसेच उपयुक्त साठा १७.१७ टीएमसी (६२.३९%) पाणीसाठा आहे. १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी एकूण साठा २२.३२ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी १.७७ टीएमसी साठा जादा आहे. सध्या बाष्पीभवन होण्याचाही वेग वाढला आहे. मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे. मोरणा धरणात ५१%, गिरजवडे ५६%, करमजाई ९८%, अंत्री खुर्द २९%, शिवणी ३२%, टाकवे ३१%, कार्वे २७% व रेठरे धरणात ९% पाणी साठा शिल्लक आहे. ४९ पाझर तलावांपैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. तर ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेला फक्त १ तलाव आहे, तर २६ ते ५० टक्के पाणीसाठा असलेले २२ तलाव आहेत. याशिवाय ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा असलेले ५ तलाव असून, ७६ ते १०० टक्के पाणीसाठा असलेले केवळ २ तलाव शिल्लक आहेत. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ३३० कुपनलिकांची पाणी पातळी घटत आहे.शिराळा तालुक्यातील कोरडे झालेले तलावहातेगाव (अंबाईवाडी), शिरसटवाडी, निगडी (कासारकी), भाटशिरगाव, निगडी (खोकडखडा), शिरशी (काळे खिंड), शिरशी (भैरववाडा), शिरशी (कासारकी), शिरशी नं. १, पावलेवाडी नं. १, पावलेवाडी नं. २, कोडाईवाडी नंबर १, शिवरवाडी, करमाळे नंबर २, कोडाईवाडी नं. २, तडवळे (वाडदरा), तडवळे नंबर १ हे शिराळा तालुक्यातील तलाव सध्या कोरडे पडले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Warna Dam Water Levels Drop; Sangli's Percolation Tanks Dry Up

Web Summary : Warna Dam's water level decreased by 10 TMC due to power generation and evaporation. 19 of 49 percolation tanks dried up in Shirala, impacting water availability for villages. A contingency plan is prepared for 17 hamlets and 13 villages facing water scarcity.