शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

रेठरे धरणामध्ये आज 'वाकुर्डे'चे पाणी, चाळीस वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:14 IST

१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे.

मानाजी धुमाळरेठरे धरण : गेली चाळीस वर्षे शेतीच्या पाण्याची वाट पाहत बसलेल्या रेठरे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या शेतात आता वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे येणार आहे. या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत रेठरे धरण तलावात होणार आहे.

१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे. चांदोली धरणातून डाव्या कालव्यामधून हे पाणी खिरवडे येथे उचलून ते हात्तेगाव येथून वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावात सोडले आहे. तेथून हे पाणी मानकरवाडी तलावातून सायफन पद्धतीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे रेड-शिराळा व रेठरे धरण, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी परिसरात मिळणार आहे.

योजनेवर २६० कोटी रुपये खर्च

आतापर्यंत या योजनेवर २६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरा फाटा रेड येथून ढगेवाडी, कापरी, जक्राईचीवाडी, शिवपुरी, लाडेगाव व इटकरे परिसरात जाणार आहे. मानकरवाडीपासून पूर्वेला चौदा किलोमीटर अंतरावर बंदिस्त पाच फूट व्यासाच्या पाईपमधून योजनेचे पाणी रेड व रेठरे धरण तलावात टाकण्यात येणार आहे. यामुळे रेठरे धरण परिसरातील ५ हजार एकर शेती पाण्याखाली येणार आहे.

५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार

रेड ते रेठरे धरणदरम्यान उंच भाग व खडक असल्याने पाणी उताराने वाहून येण्यासाठी रेठरे धरण येथे सुमारे ५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार आहे. यंदा प्रथमच शिराळाच्या पूर्वेस असणारे वाळवा तालुक्यातील या योजनेत समाविष्ट असणारे सर्व तलाव भरून घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी