शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी जल आयोगाचे `कर्णास्त्र`

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:40 PM

flood Rain Sangli-kolhapur : कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ताफ्यात `कर्णास्त्र` दाखल झाले आहे. २०१९च्या प्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने हे उपकरण उपलब्ध केले आहे. त्यामुळे पुराचा आदमास काही तास अगोदरच येणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देकृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी जल आयोगाचे `कर्णास्त्र`पुराचा आदमास काही तास अगोदरच येणे शक्य

संतोष भिसे सांगली: कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ताफ्यात `कर्णास्त्र` दाखल झाले आहे. २०१९च्या प्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने हे उपकरण उपलब्ध केले आहे. त्यामुळे पुराचा आदमास काही तास अगोदरच येणे शक्य झाले आहे.कृष्णा नदीपात्राचा अभ्यास करणाऱ्या जल आयोगाने अर्जुनवाड (ता. शिरोळ) केंद्रात उपकरण बसवले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत सांगली, कोल्हापूर जिल्हे पूरप्रवण बनले आहेत. यावर्षीही चांदोली व कोयना धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. उन्हाळी पाऊसही धो धो कोसळले आहेत. त्यामुळे पूरपट्टा पुन्हा हबकला आहे.केंद्रीय जल आयोगाची कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगांव जिह्यातील सर्व केंद्रे कृष्णा व कृष्णेस मिळणाऱ्या सर्व उपनद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेऊन आहेत. पुणे विभागाअंतर्गत सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्यांमध्ये कराड, निपळी, वारंजी, तारगांव, नांद्रे, समडोळी, अर्जूनवाड, कुरुंदवाड, तेरवाड आणि सदलगा ही दहा उपकेंद्रे आहेत. पैकी महाबळेश्वरमध्ये यापूर्वीच स्वयंचलित यंत्र बसवले आहे. २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्हे महापुरात बुडाल्याने अर्जुनवाड (ता. शिरोळ) केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.१९६९ मध्ये स्थापन झालेल्या अर्जुनवाड केंद्रावर स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. पाण्याची पातळी, गती, उंची, खोली आदीचे मोजमाप तेथे होते. कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री बोटींमधून नदीपात्रात उतरावे लागते. पाणी पातळी, खोली, रुंदी, हवेची आर्द्रता, गती, दिशा आणि तापमान यासह विसर्गाची माहिती घेतात. त्यांच्या मदतीला आता `कर्णास्त्र` हे अत्याधुनिक स्वयंचलित उपकरण मिळाले आहे.

मिरज-अर्जुनवाड पुलावर दररोज सकाळी त्याद्वारे माहिती संकलीत केली जाते. धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्याची गती पाहून संभाव्य पुराचा अंदाज घेतला जातो. कनिष्ठ अभियंता रुपेशकुमार यादव यांच्यासह आय. यु. मोमीन, उध्दव मगदूम, आर. डी. माने, राहूल डोंगरे, योगेश कोळी, गणेश डोंगरे हे जल अभ्यासक काम करीत आहेत.असे चालते कर्णचे कामप्रथम नदीपात्राची रुंदी तपासली जाते. कर्ण उपकरण पाण्यात सहा मीटरपर्यंत नेऊन खोली पाहिली जाते. अर्जुनवाड पुलावर प्रत्येक आठ मीटरवरील पॉईंटवरुन पाण्याचा ताशी वेग नोंदवला जातो. किती क्युसेक्स विसर्ग झाला? याची नोंद होते. ती पुढील केंद्राला कळवली जाते. पूरकाळात दररोज सकाळी दोन तासांच्या निरीक्षणातून संभाव्य महापुराचा अंदाज येतो.

टॅग्स :floodपूरSangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊस