सांगली महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, एका प्रभागात २३ ते २८ हजार लोकसंख्या; सर्वात मोठा अन् लहान प्रभाग कोणता.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:50 IST2025-09-04T18:49:44+5:302025-09-04T18:50:46+5:30
२०११ च्या जनगणनेवर प्रभागाची रचना

सांगली महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, एका प्रभागात २३ ते २८ हजार लोकसंख्या; सर्वात मोठा अन् लहान प्रभाग कोणता.. जाणून घ्या
सांगली : बहुप्रतिक्षित महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. या नव्या रचनेत लोकसंख्येनुसार सह्याद्रीनगरचा प्रभाग (क्रमांक ९) सर्वांत मोठा तर सांगलीवाडीचा प्रभाग (१३) सर्वांत लहान ठरला आहे. इतर प्रभागांत साधारण २३ ते २८ हजार लोकसंख्या आहे. महापालिकेने २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या गृहित धरून प्रभागांची रचना केली आहे. या लोकसंख्येत आणखी चार ते पाच हजारांची वाढ होऊ शकते.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात एकत्रित २० प्रभाग आहेत. त्यातील १८ प्रभाग चार सदस्यीय तर २ प्रभाग तीन सदस्य असणार आहेत. ही प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येवर आधारित आहे तेव्हा शहराची लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ इतकी होती. प्रभाग रचनेचा मुख्य आधार लोकसंख्या आहे. प्रारुपमध्ये २४ ते २८ हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये सर्वाधिक २८ हजार २६८ लोकसंख्या आहे तर सर्वांत कमी लोकसंख्या सांगलीवाडीच्या प्रभाग १३ मध्ये १६ हजार ९५३ इतकी आहे.
कसा आहे सर्वांत मोठा प्रभाग ९
प्रभाग क्रमांक नऊची व्याप्ती मोठी आहे. मार्केट यार्डापासून सुरू होणारा या प्रभागात वसंत कॉलनी, गेस्टहाऊस, सरस्वती कॉलनी, पोलीस मुख्यालय, सह्याद्रीनगर, मनिषा टेस्ट बँक कॉलनी, क्लासिक पार्क, जवाहर हौसिंग सोसायटी, गांधी कॉलनी, राजीवनगर, समर्थ कॉलनी, अभयनगर, समाधान कॉलनी, गीतासाई कॉलनी, आरवाडे पार्क, आनंद पार्क या परिसराचा समावेश आहे.
सर्वांत लहान प्रभाग
सांगलीवाडीतील कदमवाडी रस्त्यापासून या प्रभागाची सुरुवात होते. इस्लामपूर रोड, विठ्ठलमंदिर, मंगोबा मंदिर, बाळूमामा मंदिर, राणाप्रताप चौक, समडोळी रस्ता, दत्तनगर, बौद्ध वसाहत, चर्मकार वसाहत, साईनगरपर्यंत प्रभागाची व्याप्ती आहे.
प्रभागाची लोकसंख्या
प्रभाग क्रमांक - लोकसंख्या - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती
१ - २८०५६ - ४०९१ - १७२
२ - २५०३६ - ४७३१ - २००
३ - २७३७५ - ५४६४ - ८२
४ - २६८७९ - २५०८ - ७७
५ - २५८८३ - २९४२ - २७३
६ - २४२८७ - १३३६ - २८
७ - २४१०५ - ४६०४ - १८८
८ - २५५९६ - ४६६१ - २७०
९ - २८,२६८ - २५२७ - २३२
१० - २५७८१ - ६१०८ - ८७
११ - २३३७५ - ४२९० - १०३
१२ - २५५९८ - ३२४६ - ९९
१३ - १६९५३ - १९८७ - १४३
१४ - २७६४९ - ३८२३ - २०४
१५ - २४४२७ - ३१६६ - ६३
१६ - २७३४८ - २०३३ - ११७
१७ - २४९३८ - १७३० - १९९
१८ - २७१३६ - ५२३२ - ३९१
१९ - २४१८२ - ३७८९ - २५२
२० - १९९२१ - ४५९२ - ३१६
एकूण सदस्य आणि आरक्षण
- एकूण सदस्य : ७८
- अनु. जाती : ११
- अनु. जमाती : १
- नागरिक मागास प्रवर्ग : २१
- सर्वसाधारण : ४५
महिलांसाठी आरक्षित पदे
- एकूण महिला सदस्य : ३९
- अनु. जाती : ६
- अनुसूचित जमाती : १
- ओबीसी : ११
- सर्वसाधारण : २२
अनुसूचित जाती प्रवर्गात प्रभाग १० मोठा
अनसूचित जाती प्रवर्गासाठी ११ प्रभाग राखीव आहेत. त्यात सांगलीतील टिंबर एरियाच्या प्रभाग १० मध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. या प्रभागात ५ हजार ९४२ लोकसंख्या आहे. त्याखालोखाल कुपवाडमधील प्रभाग ३ मध्ये ५ हजार ५६७, शामरावनगरच्या प्रभाग १८ मध्ये ५,३३२ लोकसंख्या आहे. अन्य सहा प्रभागांत ४ हजार ते पाच हजारांदरम्यान लोकसंख्या असून, सर्वांत कमी मिरजेतील प्रभाग-६ मध्ये १,३३६ लोकसंख्या आहे.
अनु. जमातीत प्रभाग १८ आघाडीवर
अनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग राखीव आहे. गतवेळी मिरजेतील प्रभाग २० मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण होते. या प्रभागात ३१६ इतकी लोकसंख्या आहे; पण सांगलीतील प्रभाग १८ मध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३९१ इतकी आहे. सर्वांत कमी लोकसंख्या प्रभाग १५ मध्ये आहे.