विटा पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:13 IST2021-06-12T11:12:33+5:302021-06-12T11:13:55+5:30

Crimenews Sangli : करंजे (ता.खानापूर) येथील पोपट माने या ६० वर्षाच्या वृध्दाला विटा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील खानापूर औट पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले असून याप्रकरणी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सदानंद मारूती वाघमोडे यांना निलंबीत करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश काढून हवालदार वाघमोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

Vita police constable suspended | विटा पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबीत

विटा पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबीत

ठळक मुद्देविटा पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबीत करंजेच्या वृध्दाला मारहाण : पोलीस प्रमुखांची कारवाई

विटा (सांगली) : करंजे (ता.खानापूर) येथील पोपट माने या ६० वर्षाच्या वृध्दाला विटा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील खानापूर औट पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले असून याप्रकरणी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सदानंद मारूती वाघमोडे यांना निलंबीत करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश काढून हवालदार वाघमोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

करंजे येथील भगतमळा येथे वास्तव्यास असलेले पोपट माने व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. याची माहिती पोलीस हवालदार वाघमोडे यांना मिळाल्यानंतर यांनी सोमवारी रात्री १० वाजता माने यांना करंजे येथून खानापूर पोलीस औट पोस्त ठाण्यात आणले.

त्यावेळी त्यांनी वृध्दाला काठीने पाठीवर, पायावर व मांडीवर जबर मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेऊन पोलीस हवालदार सदानंद वाघमोडे यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.

Web Title: Vita police constable suspended