शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बेळुंखी येथे द्राक्षबागेला आग

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

दहा लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; वीज जनित्रामधून ठिणग्या

जत : तालुक्यातील बेळुंखी येथील वीज जनित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सीताराम यशवंत चंदनशिवे यांची एक एकर द्राक्षबाग व त्यातील साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.बेळुंखी ते वाशाण रस्त्यावर बेळुंखीपासून सुमारे तीन किलोमीटरवर चंदनशिवे यांची शेतजमीन आहे. कर्ज काढून आणि हातउसने पैसे घेऊन त्यांनी माळरानावर एक एकर द्राक्षबाग तयार केली होती. बागेच्या एका बाजूला विद्युत जनित्र आहे. शनिवारी दुपारी या जनित्रातील तारेमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊन ठिणग्या पडू लागल्या. त्या ठिणग्या जमिनीवरील गवतावर पडून गवताने पेट घेतला व तशीच आग पुढे द्राक्षबागेत पसरली. वाऱ्यामुळे क्षणार्धात संपूर्ण बाग जळून भस्मसात झाली. बागेला लागूनच चंदनशिवे यांचे घर आणि जनावरांचा गोठा आहे. आग लागताच घरातील सर्वजण बाहेर पळत आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घराजवळ येत असलेली आग आटोक्यात आणली. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकत असल्यामुळे बागेला लागलेली आग विझविता आली नाही.या आगीमध्ये एक एकर द्राक्षबाग, दोन हजार कडब्याची गंजी, एचटीपी पाईप, ठिबक संच, द्राक्षबागेतील पीव्हीसी पाईप व सबमर्सिबल पंपासाठी जोडलेली पाईप, आदी सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे. याप्रकरणी तहसीलदार डी. एम. कांबळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व डफळापूर (ता. जत) मंडल अधिकारी ताजुद्दीन मुल्ला यांना पंचनामा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन अहवाल सादर केला आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)