शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रजमध्ये दक्षता समितीची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:27 IST

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे नोडल अधिकारी वर्षा पाटील यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. लोकमत न्यूज ...

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे नोडल अधिकारी वर्षा पाटील यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे कोरोना रुग्ण सापडत असून, दक्षता समितीमधील सदस्या उदासीन दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर कसबे डिग्रज मंडलच्या नोडल अधिकारी तथा महिला बालकल्याण अधिकारी वर्षा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्यासह रुग्णाच्या घरी थेट भेट देऊन ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्यासह समितीची झाडाझडती घेतली.

कसबे डिग्रज येथे दोन कोरोना रुग्ण असताना तंटामुक्ती समिती व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन दहा दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला; पण अद्यापही गावात लोक फिरत आहेत. मावा, गुटखा दारूची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. याबाबत वर्षा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे, तलाठी के. एल. रुपनर यांना जबाबदारीने कामे करा, लोकांच्या जीविताशी खेळू नका, असे सांगितले.

सध्या कोरोना रुग्णांच्या घराला फलक नाहीत, कंटेन्मेंट झोन केले नाहीत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात नाही. विलगिकरणाबाबत नियोजन नाही, सामाजिक विलगिकरण कक्ष सुरू केले; पण लोक कमी वापरतात, अशी परिस्थिती आहे, ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न विचारला; तसेच दरम्यान कृषी सहायक गीतांजली चव्हाण हजर नसतात त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चौकट

सुरक्षा साधने कधी?

गावात सध्या ३८ कोरोना रुग्ण आहेत. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, तलाठी दक्ष नाहीत. याबद्दल नोडल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

गावात कडक बंद असूनही दारू, मावा यांची चढ्या दराने विक्री सुरू आहे.

आशा सेविकांना कोणत्याही प्रकारची साधने न देता जबाबदारी ढकलण्यात येत आहे.