Ashta Nagar Parishad Election Result 2025: आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील-विलासराव शिंदेंच्या शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:48 IST2025-12-21T13:48:05+5:302025-12-21T13:48:05+5:30
आष्टा (जि. सांगली ) : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे ...

Ashta Nagar Parishad Election Result 2025: आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील-विलासराव शिंदेंच्या शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय
आष्टा (जि. सांगली) : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील आष्टा शहर विकास आघाडीने २४ पैकी २३ जागी विजय खेचून आणला आहे. विरोधी महायुती गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल विलासराव शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपचे उमेदवार प्रवीण उर्फ सतीश माने यांचा दणदणीत पराभव केला. विशाल शिंदे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.
