शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

माहिती अधिकाराचा वापर जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:41 IST

प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याऐवजी ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर

संतोष भिसेसांगली : माहिती अधिकाराद्वारे प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याऐवजी ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात दहा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद मुख्यालयाकडे माहिती अधिकाराचे सरासरी १०० अर्ज प्रत्येक महिन्याला दाखल झाले, यातील बहुतांश अर्ज विशिष्ट विभागाकडेच आले आहेत.माहितीची विचारणा होण्यात बांधकाम विभाग आघाडीवर आहे. शिवाय ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, सामान्य प्रशासन, समाजकल्याण या विभागांकडेही अर्जांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश अर्जांचा हेतू स्वच्छ नसल्याचे आढळले आहे. उत्तरे निर्धारित वेळेत दिली जातात, पण यासाठी प्रशासनाचा कामाचा बहुमोल वेळ खर्ची पडतो.१९८५ पासूनच्या माहितीची विचारणाएका ग्रामपंचायतीकडे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याने १९८५ पासूनची माहिती मागितली. ग्रामपंचायतीने कर्मचारी कामाला लावून माहिती संकलित केली. तिच्या झेरॉक्स प्रतींचा खर्च १८ हजार रुपयांवर गेला. पैसे भरण्याचे पत्र अर्जदाराला दिले, पण, त्याने पैसे भरलेच नाहीत. ग्रामपंचायतीकडेही फिरकला नाही. पण, या उठाठेवीत प्रशासनाचा वेळ खर्च पडला. नाहक मनस्तापही झाला.

जिरवाजिरवीच अधिकबांधकाम विभागात कामे मिळविण्याच्या स्पर्धेत अर्जाचा वापर हत्यारासारखा होत आहे. निविदा प्रक्रिया, गुणवत्ता, अंदाजपत्रक आदींविषयी सातत्याने अर्ज येतात. गतिमान आणि पारदर्शक प्रशासन हा माहिती अधिकार कायद्याचा हेतू आहे. पण, अधिकाऱ्यांची जिरवाजिरवी आणि ब्लॅकमेलिंगसाठीच अधिक वापर होत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या वर्षातील अर्ज असे- अर्ज - १ हजार २८५- निकाली - १ हजार २३३- उत्तरे दिलेले - १ हजार २२५- माहिती नाकारलेले - ८- पंचायत समित्यांकडे अर्ज - ७३३- जिल्हा परिषदेकडे - ५५२- गावस्तरावरुन पंचायत समितीकडे अपिल ३६५- जिल्हा परिषदेकडे अपिल १४७ 

वर्षभरातील बहुतांश अर्ज निकाली काढले आहेत. निर्धारित कालावधीत अर्जांना उत्तरे दिली जातात. अपिलासाठी आलेले अर्जही वेळेत निकाली काढले आहेत. - राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद

माहिती अधिकाराची ताकद मोठी असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेरीस आणता येते. कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे याद्वारे बाहेर काढली आहेत. पण, त्याच्या गैरवापराची उदाहरणेही समोर येत आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पैसे उकळण्यासाठीही वापर होत आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची बदनामी होते. यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. - सुरेश हराळे, माहिती अधिकार चळवळ कार्यकर्ता

टॅग्स :SangliसांगलीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता