सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:05 IST2023-11-29T16:04:55+5:302023-11-29T16:05:10+5:30
रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंबांना फटका बसला असून, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा झाला आहे. मंगळवारी दुपारीही सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. सोमवारी दिवसभर नागरिक उखाड्याने हैराण झाले होते. मंगळवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतरही अवकाळी पावसाने मिरज, सांगली शहरासह कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत हजेरी लावली आहे. या तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांना अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच ढगाळ हवामान असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांना फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)
तालुका - पाऊस
मिरज - ३.९
जत - ६.६
क.महांकाळ - २४.१