शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपच्या फळीस एकसंध काँग्रेसचा हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 15:20 IST

भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता.

ठळक मुद्देमात्र मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत अत्यंत सोपा वाटणारा हा पेपर भाजपसाठी गतवेळेपेक्षा अधिक अवघड व घाम फोडणारा ठरला.

अविनाश कोळी ।सांगली : गेल्या पाच वर्षांच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला चारीमुंड्या चित करणाऱ्या भाजपला या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जबरदस्त हादरा दिला. काँग्रेस एकसंध झाली तर काय होऊ शकते, याची प्रचिती या लढतीमधून आली. भाजपने ही लढत जिंकली असली तरी, काँग्रेसच्या नव्या चेहºयाने दिलेली झुंज लोकांची मने जिंकणारी ठरली.

भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत अत्यंत सोपा वाटणारा हा पेपर भाजपसाठी गतवेळेपेक्षा अधिक अवघड व घाम फोडणारा ठरला.

वसंतदादा घराण्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसली तरी, पक्षहितासाठी वसंतदादा घराणे पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे व प्रामाणिकपणे उभे राहिले. त्यात पुन्हा राष्टÑवादीची प्रामाणिक साथ लाभणे, हा लाभाचा योग होता. २0१४ च्या निवडणुकीत याच राष्टÑवादीचा लाभ भाजपला झाला होता. त्यामुळे भाजपलाही स्वबळावर हा गड काबीज करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे होते. दोन्हीकडून युद्धाची तयारी सुरू झाली, मात्र भाजप काँग्रेसच्या ताकदीबद्दल गाफील राहिली आणि त्यामुळेच निवडणुकीत मताधिक्य प्रचंड घटले. विजयासाठी शेवटपर्यंत ह्यसलाईनह्णवर राहावे लागले. भाजपने लढत जिंकली असली तरी, त्यांच्या ताकदीला जबरदस्त हादरे देण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाElectionनिवडणूक