सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याकडून सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त 

By शरद जाधव | Updated: May 20, 2023 19:25 IST2023-05-20T19:24:30+5:302023-05-20T19:25:54+5:30

शहर पोलिसांची कारवाई; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता 

two wheeler worth a quarter of a lakh seized from a two wheeler theft in sangli | सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याकडून सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त 

सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याकडून सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त 

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरासह मिरज परिसरातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास सांगली शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. सौरभ राजेंद्र इंगळे (वय २२, रा. मेंढे मळा, पंढरपूर रोड,मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ३० हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरात दुचाकी चोरीतील आरोपींवर कारवाईसाठी शहर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित इंगळे हा सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर उभा आहे. पथकाने तिथे जात त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, इंगळेने तिथून धूम ठाेकली. यानंतर पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली. याशिवाय सांगली ग्रामीण आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही दुचाकी लंपास केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: two wheeler worth a quarter of a lakh seized from a two wheeler theft in sangli