शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Sangli: दुचाकीस धडकून पोलिसांची जीप उलटली, दुचाकीस्वारासह तिघे पाेलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:24 IST

जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

बेडग : बेडग (ता. मिरज) येथील रामनगरजवळ पाेलिसांच्या जीपची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जीपमधील तीन पाेलिस कर्मचारीही किरकाेळ जखमी झाले. दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला असून, जीपचेही माेठे नुकसान झाले. सोमवार, दि. ९ रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.मिरज उपविभागीय पाेलिस कार्यालयाकडील निर्भया पथक सायंकाळी जीपमधून (एमएच १० एन ०६४३) कार्यक्षेत्रामध्ये गस्तीवर हाेते. आरग-मिरज रस्त्यावर बेडग येथील रामनगरजवळ समाेरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस ( केए २३ इएस १३४५) पाेलिसांच्या जीपची जाेरदार धडक बसली. अपघातात दुचाकीस्वार महादेव रायाप्पा निवलगी (रा. मदभावी, ता. अथणी) हा गंभीर जखमी झाला, तर जीपमधील पाेलिस उपनिरीक्षक संभाजी धेंडे, हवालदार अजित कोळेकर व इरवंत हेमलवाड यांना किरकोळ दुखापत झाली.अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या बाजूस उडून पडली, दुचाकीस्वार महादेव निवलगी रस्त्याकडेला फेकले गेले. तसेच पाेलिसांची जीप रस्त्यालगतच्या गटारीमध्ये जाऊन उलटली. तत्काळ सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच मोटार परिवहन विभागाचे पाेलिस निरीक्षक सचिन दंताळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अधिक तपास सुरू आहे. पाेलिसांच्या वाहनाने दुचाकीस धडक दिल्याचे वृत्त समजताच अपघातस्थळी माेठी गर्दी झाली हाेती.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातPoliceपोलिस