शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Sangli: रिलायन्स दरोड्यातील आणखी दोघांना अटक, डेहराडूनमधून घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:46 IST

आतापर्यंत पाच जणांना अटक

सांगली : येथील रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणात सहभागी असलेल्या एसपी ऊर्फ अनिल सोनी (रा. जिंदाल सॉ लिमिटेड, मुंद्रा, गुजरात) व शशांक ऊर्फ सोनू धनंजयकुमार सिंग (रा. सोनपुरा, जि. सदरसा, बिहार) या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी डेहराडून येथील कारागृहातून ताब्यात घेतले. दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली असून, दरोड्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. एसपी हे टोपणनाव असलेला अनिल सोनी सांगलीत दरोड्यावेळी पोलिस अधिकारी असल्याचे सांगून आतमध्ये घुसला होता.येथील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्सवर मुख्य सूत्रधार सुबोधसिंग याच्या टोळीने जून २०२३ मध्ये सशस्त्र दरोडा टाकला होता. पोलिस असून तपासासाठी असल्याचे सांगून टोळीने सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांना बांधून घालून पावणेसात कोटी रुपयांचे दागिने लांबवले होते. दरोड्यावेळी एक ग्राहक आतमध्ये आल्यानंतर तो घाबरून पळून जाताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. भरदिवसा टाकलेल्या दरोड्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान होते.

सांगली पोलिसांनी कसून तपास करत सुबोधसिंगच्या टोळीने दरोडा टाकल्याचे निष्पन्न केले. सुबोधसिंगने कारागृहातून सूत्रे हलवून टोळीच्या माध्यमातून दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर सांगली पोलिसांनी सुबोधसिंगला ताब्यात घेऊन तपास केला. त्याच्याबरोबर दरोड्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय २५, रा. तारवान, नौबातपूर, जि. पाटणा, राज्य बिहार), महंमद शमशाद महंमद मुख्तार (वय २३, रा. चेरिया, जि. बेगुसराय, राज्य बिहार) यांनाही अटक केली आहे.दरोडा प्रकरणात डेहराडून येथून अनिल सोनी व शशांक सिंग या दोघांचा ताबा घेतला. सांगलीत न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोघांना २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आतापर्यंत टोळीतील पाच जणांना अटक करण्यात यश आले आहे.

पोलिस असल्याचे भासवलेएसपी ऊर्फ अनिल सोनी याने दरोडा टाकताना पोलिस असल्याचे भासवले होते. तो टोळीमध्येही एसपी या नावानेच प्रसिद्ध आहे, तर शशांक सिंग याने कारागृहातून दरोड्यावर नियंत्रण ठेवले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे तपास करत आहेत.

सांगलीनंतर डेहराडूनला दरोडासांगलीतील दरोड्यानंतर डेहराडून येथे रिलायन्स ज्वेल्सवर नोव्हेंबर २०२३ मध्ये दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात सहभागी असल्याच्या संशयावरून हरयाणा येथून एसपी ऊर्फ अनिल सोनी याला अटक केली होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस