सांगली : सांगलीसह कोल्हापूर, ऱत्नागिरी जिल्ह्यात मंदिरात चोऱ्या करून धुमाकूळ घातलेल्या अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदीलवाडी, ता. पलूस), संभाजी राजाराम जाधव (३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांनीअर्जुनवाड (ता. शिरोळ), रत्नागिरी येथील मंदिरांतीलचोरी तसेच सांगलीतील घरफोडीकेल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सांगलीतील राम मंदिरजवळील संजोग कॉलनीत राहणाऱ्या सम्राट विश्वनाथ माने (वय ५३) यांच्या बंगल्यात दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती. याबाबत माने यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी हणमंत लोहार, सुशील मस्के, अभिजित ठाणेकर, ऋतुराज होळकर यांचे पथक मालमत्तेच्या गुन्ह्याचा तपास करत असताना दोघेजण चोरीची भांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार परिसरात सापळा रचला. तेवढ्यात दोघेजण दुचाकीवरून गोणपाटात वस्तू घेऊन तेथे आले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा दोघांनी अक्षय मोरे व संभाजी जाधव अशी नावे सांगितली. अक्षयच्या पँटच्या खिशात सोन्याचे मंगळसूत्र व चार पदरी सोन्याचा हार मिळाला. गोणपाटात चांदीचे, तांब्याचे व पितळेचे साहित्य मिळाले.
दोघांची कसून चौकशी केल्यानंतर सांगलीत राम मंदिरजवळ बंद बंगल्यात चोरी केल्याचे तसेच अर्जुनवाडचे गणपती मंदिर, रत्नागिरी शहरातील गणपती मंदिरात चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. दोघांकडून ४२ किलो २३० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. त्याची किंमत १२ लाख ७ हजार ५८९ रुपये आहे. तसेच ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅमचा तीन पदरी हार असे ३ लाख ९३ हजार ६०२ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपयांची १२ किलो वजनाची पंचधातूची गणेशमूर्ती, तांब्याची भांडी व दुचाकी असा १७ लाख ६ हजार ३४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हणमंत लोहार, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, प्रमोद साखरपे, सोमनाथ पतंगे, सुमित सूर्यवंशी, रोहन घस्ते, सुनील जाधव, शिवाजी शीद, सुशांत चिले, गणेश शिंदे, अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मंदिरात चोरीची मोडस ऑपरेंडीअक्षय मोरे याला आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरात चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती.त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरीत श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार २९ सप्टेंबर २०२५ रोजी चोरला होता. तसेच अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील मंदिरातील पंचधातूची गणेशमूर्ती चोरली होती.तीन जिल्ह्यांतील पोलिस मागावरसांगलीसह रत्नागिरी व शिरोळ पोलिस दोघांच्या मागावर होते. परंतु, ते चकवा देत फिरत होते. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
Web Summary : Two temple thieves, Akshay More and Sambhaji Jadhav, were arrested in Sangli. They confessed to thefts in temples across Sangli, Kolhapur, and Ratnagiri. Police recovered ₹17 lakh worth of stolen gold, silver, and idols.
Web Summary : सांगली में दो मंदिर चोर, अक्षय मोरे और संभाजी जाधव, गिरफ्तार। उन्होंने सांगली, कोल्हापुर और रत्नागिरी में मंदिरों में चोरी कबूल की। पुलिस ने ₹17 लाख के सोने, चांदी और मूर्तियाँ बरामद कीं।