शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पणुंब्रेत दोन बिबट्यांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 23:55 IST

विषबाधेचा संशय : विच्छेदन तपासणीस विलंब

वारणावती : पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) येथील बोर्गेवाडीत रविवारी सकाळी दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. अंदाजे तीन ते चार वर्षांच्या या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद दिसत असून, त्यापैकी एक नर व एक मादी आहे. दोन्ही बिबट्यांची लांबी तीन ते चार फूट आहे.पणुंब्रे (ता. शिराळा) येथील बोर्गेवाडीच्या दरा परिसरात रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे तीन ते चार वर्षे वयाच्या या नर बिबट्याची लांबी तीन फूट ११ इंच, तर उंची ७९ सेंटिमीटर आहे. त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्त होत असतानाच त्याच परिसरात डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक बिबट्या मृत झाल्याची घटना उघडकीस आली. वन विभागाकडून दुसऱ्या बिबट्याच्या मृत्यूची माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सकाळी नऊ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ही बातमी समजताच दरा परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पंधरा दिवसांपूर्वी परिसरातील निवृत्ती बोर्गे यांची शेळी बिबट्याने ठार केली होती. येथील गुंडगेवाडी, सोनवडे, किनरेवाडी, खराळे परिसरात चरणाऱ्या जनावरांवर वारंवार बिबट्याने हल्ले केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत वनअधिकारी तानाजी मुळीक यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यांच्या पंचनामा व उत्तरीय तपासणीचे काम सुरूहोते. घटनास्थळी वनपाल ए. एन. एकसंबेकर, वन कर्मचारी शंकर नायकवडी, शिवाजी पाटील, लक्ष्मण झोले, विकास बोर्गे, वैभव गुरव उपस्थित होते. मृत्यू कशामुळे?या बिबट्यांचा मृत्यू निमोनिया, दमछाक किंवा विषबाधेमुळे झाला असावा, अशी चर्चा होती. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.