शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: शेगावजवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:56 IST

Sangli Accident: ओव्हरटेक करताना झाला अपघात

जत : पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गावरील शेगावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय २५, मूळ रा. चिकलगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) अशी मृत तरुणांची नावे आहेत.याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेनंतर जत पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, कामन्ना हत्तळी व सचिन व्हनमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत. त्यांना माल पोहचविण्यासाठी चेन्नईला जायचे होते. मात्र, मयत हत्तळी याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी गावी लग्न असल्याने त्याने मित्र व्हनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगितले. माल भरलेला कंटेनर शेगाव येथील पंपावर होता. त्यामुळे हत्तळी यांनी व्हनमाने यास दुचाकीवर बसविले व कंटेनरजवळ सोडण्यासाठी ते निघाले. दोघे दुचाकीवरुन शेगावहून पेट्रोलपंपावर जाण्यासाठी निघाले होते.दरम्यान, जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर या कंटनेरला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगलेहत्तळी याचे कुटुंब मंगळवेढा तालुक्यातील चिकलगीचे. मृत कामन्ना याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी ५ डिसेंबरला जाडरबोबलाद (ता. जत) लग्न होते. त्यामुळे कामन्ना याने सुटी घेत शिगावहून जाडरबोबलादला जाण्याची तयारी केली होती. भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न रंगविले होते. मात्र, अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. लग्नघरात शोककळा पसरली.कंटेनरचालकांचा कंटेनरनेच घेतला जीवदोघेही तरुण कंटेनरचालक होते. मात्र, अपघात घडला तेव्हा ते दुचाकीवर होते. त्यांच्या वाहनाला एका कंटेनरनेच धडक दिली अन् दोघांचा जीव गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Container-bike accident near Shegaon kills two; brother's wedding dream shattered.

Web Summary : Two killed in Shegaon container-bike collision. Kamanna Hattalli, Sachin Vhanmane, container drivers, died en route to a container. Hattalli missed his brother's wedding. Tragedy struck.
टॅग्स :bikeबाईकSangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू