मिरज : रविवारी रात्री भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेते पद मिळवल्याने विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरज मार्केट परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीमुळे दोन गट आमने-सामने आले. वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पिटाळले.भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात तरुणांनी मोठा जल्लोष केला. हातात तिरंगा ध्वज घेऊन तरुण जल्लोषासाठी मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते. यावेळी दुसरा गट तेथे आल्यानंतर काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी दुसऱ्या गटाने हुल्लडबाजीस सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाकडून घोषणा व प्रतिघोषणा सुरू झाल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाना धार्मिक घोषणांनी प्रत्युत्तर देत हुल्लडबाजी सुरू झाल्याने यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही गटाचा जमाव वाढत गेल्याने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांच्यासह पोलिस फौजफाटा लक्ष्मी मार्केट परिसरात दाखल झाला. पोलिसांनी लाठीमार करत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना जमावाला पांगवले. यानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची गस्त सुरू होती. या घटनेबाबत पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी, मिरजेत जल्लोषावेळी दोन गट भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:28 IST