कामेरी येथे दोन कुटुंबांत मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:53+5:302021-06-26T04:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे लहान मुलास दटावल्याच्या कारणातून दोन कुटुंबांत मारामारी झाली. यामध्ये विळा ...

कामेरी येथे दोन कुटुंबांत मारामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे लहान मुलास दटावल्याच्या कारणातून दोन कुटुंबांत मारामारी झाली. यामध्ये विळा आणि काठीचा वापर करण्यात आला. त्यात दोन्हीकडील पाचजण जखमी झाले. ही मारामारी गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास झाली. याबाबत पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
सागर बाजीराव पाटील, रणजित बाजीराव पाटील, निखिल बाबासाहेब माने, अमर बाबासाहेब माने, जयवंत विठ्ठल पाटील अशी जखमींची नावे आहेत. सागर पाटील याने दिलेल्या फिर्यादीत तो आणि भाऊ रणजित असे दोघे शेतातील गोठ्यात काम करत होते. त्यावेळी अमर बाबासाहेब माने, बाबासाहेब बापू माने, निखिल बाबासाहेब माने, जयवंत विठ्ठल पाटील, सुनीता जयवंत पाटील, योगेश अर्जुन पाटील अशा सहाजणांनी मिळून लहान मुलास धमकवल्याचा जाब विचारत लोखंडी विळा आणि काठीने दोघांना जबर मारहाण केली. या सर्वांविरुद्ध मारहाणीसह गर्दी, मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निखिल माने याने दिलेल्या फिर्यादीत रणजित आणि सागर बाजीराव पाटील यांनी मुलास का धमकावले याचा जाब आम्हाला विचारताय का? असे म्हणत काठ्यांनी केलेल्या मारहाणीत स्वतः निखिल, भाऊ अमर आणि काका जयवंत पाटील अशा तिघांना जखमी केल्याचे म्हटले आहे. दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.